1

Topic: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

Aplya paiki kunihi jevnha "BIG BANG" Theory baddal khup kholwar vichar krto tenva aplyala ase lakshyat yete ki hya theory mdhe 90% kalpanik ahet.

2

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

How? Please elaborate...

Otherwise, it is going to be a non-scientific statement.

3

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

मी Confucius यांच्या मताशी सहमत आहे. कोणतेही शास्त्रीय विधान करताना त्याला वैज्ञानिक संदर्भांचा, पुराव्यांचा किंवा स्पष्टीकरणाचा आधार असावा लागतो. Haridas यांनी केलेले विधान हे कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय केले गेलेले निराधार विधान आहे.

4

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

@confucius
I love science , i respect everyone who believe on science.
And like others i also have some questions.
Before "BIG BANG"  there was gravity, matter, open space then why all are interested to make a "BLAST"?

5

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

अंतराळ (space), गुरूत्वाकर्षण (gravity) तसंच विश्व घडवणारे पदार्थ (matter) हे सर्व विश्वाच्या आतच सामावले आहेत. या विश्वाच्या बाहेर काहीच अस्तित्वात नाही.

किंबहुना, विश्वजन्म ज्यातून घडून आला त्या घटनेला वापरला जाणारा Big bang  किंवा महास्फोट हा शब्दच काहीसा चुकीचा आहे. हा काही स्फोट नव्हता. ही फक्त विश्वाच्या प्रसरणाच्या सुरूवातीची स्थिती होती. हबलने मांडलेल्या सिद्धांतानुसार विश्व प्रसरण पावत आहे. या पूर्वी विश्वाचा आकार अर्थातच त्याच्या आजच्या आकारापेक्षा लहान होता. पावणेचौदा अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा महास्फोट घडून आला तेव्हा विश्व हे एका बिंदूवत् जागेत सामावले होते. अंतराळाची सीमा ही या बिंदूपुरतीच मर्यादित होती, त्यामुळे त्या काळात जे जे काही अस्तित्वात होते ते या बिंदूवत विश्वातच. या बिंदूच्या बाहेर काहीच अस्तित्वात नव्हतं. (खरं तर, विश्वजन्मानंतर विश्वात फक्त प्रारणं अस्तित्वात होती. विविध प्रकारच्या कणांच्या स्वरूपातील पदार्थांच्या निर्मितीची सुरूवात होण्यासाठी काही ‘क्षण’ जावे लागले.) ‘काळा’ ची (time) निर्मितीसुद्धा या ‘महास्फोटाटपासूनच झाली. त्यामुळे - Before "BIG BANG" there was gravity, matter, open space then why all are interested to make a "BLAST"? – हे आपलं म्हणणं चुकीचे आहे.

अधिक माहितीसाठी नोबेल पारितोषिक विजेत्या स्टिव्हन वाईनबर्ग यांनी लिहिलेले The First Three Minutes हे सोप्या भाषेतील सुंदर पुस्तक वाचावे.

6

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

@rajeev.
तुमचे स्पष्टीकरण चांगले आहे, पण त्यामुळे हा वाद-विवाद संपणार नाही.
विश्व हे एका बिंदुवत आकाराएवढे होते, हे विधान काल्पनिक वाटत नाही का? विश्व प्रसरण पावत आहे याचा अर्थ असा कधीच होत नाही कि ते आधी एका बिंदू एवढे होते.
जिथे माणसाची विचारशक्ती, निरीक्षण थांबते तिथे माणूस तर्क-वितर्क वापरतो. आपण समजतो एखादी गोष्ट घडायला कारण लागत, पण ते जर आपल्या फक्त तर्क बुद्धीवर अवलंबून असेल तर ते चुकीचे असू शकते.
मी मान्य करतो कि विश्वाच्या उत्क्रांती बद्दल माणसाला अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे.
अस असेल किंवा तस असेल म्हणून आपण शोधाचे बरेच पर्याय बाजूला ठेवत आहोत.
कुणी चुकीचा  विचार करतोय हे सिद्द्ध करायचं नाही आहे आपल्याला.

"फक्त  बिंदू आणि सगळे सुटलो एकदाच विश्व निर्मितीच्या कचाट्यातून"- अस म्हणून चालणार नाही.

एक नंतर दोन -दोन नंतर तीन -तीन नंतर चार येतो हे सगळ्यांना माहित आहे, आणि हेच माणसाचा विचार करण्याचा नियम आहे.
पण विज्ञान एवढ सोप नाही आहे.

7

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

Regarding the last part of your arguement...

Albert Einstein once said -

“common sense is the layer of prejudices put down before the age of eighteen……It is difficult to get rid of deep-rooted prejudices, but there is no other way!”

8

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

@confucius.

Logic will get you from A to B. Imagination will take you everywhere-Albert Einstein

9

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

Thanks to Einstein-

Any intelligent fool can make things bigger and more complex... It takes a touch of genius - and a lot of courage to move in the opposite direction.
Albert Einstein

you can more quotes on

Read more at http://www.brainyquote.com/quotes/authors/a/albert_einstein.html#F4axgLLwOfBatVTF.99

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

10

Re: "BIG BANG" Theory hi kalpanik ahe ki vastav?

ही चर्चा दिशाहीन होत चालल्यामुळे ती इथेच थांबवण्यात येत आहे.