1

Topic: Fale pikavane

Bajaratun apan fale anlyanantar ti rasayanik prakriya keleli nahit he kase olakhave?(will somebody write this question in marathi & post it on this topic)

2

Re: Fale pikavane

sudhir dakare 1 यांनी विचारलेला प्रश्न खालील प्रमाणे आहे...

बाजारातून आपण फळे आणल्यावर ती रासायनिक प्रक्रिया केलेली नाहीत हे कसे ओळखावे?

3

Re: Fale pikavane

सदर प्रश्न उत्तरासाठी परिषदेतील तज्ज्ञांकडे पाठवित आहोत.

दरम्यान विज्ञानपिठाच्या सभासदांनीही यावर मते व्यक्त करावित ही अपेक्षा...

4

Re: Fale pikavane

परिषदेशी संबंधित तज्ज्ञांकडून या प्रश्नावर आलेले उत्तर -

(१) नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फळांचा रंग हा साधारणपणे सगळ्या बाजूंनी एकसारखा नसतो. त्यांतीस छटांत किंचितसा फरक असतो. याउलट रासायनिक प्रक्रियेने पिकवलेल्या फळांचा रंग हा सर्व बाजूंनी सारखा असतो. (जी फळे नैसर्गिकरीत्या पिकूनसुद्धा एकसारखा रंग धारण करतात ती या पद्धतीला अपवाद ठरू शकतात.)

(२) फळ हे रायनिकरीत्या पिकवलेले आहे की नाही हे ओळखण्याचा खरा मार्ग म्हणजे त्याची चव. रासायनिकरीत्या पिकवलेली फळं ही नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फळांच्या तुलनेत कमी चवीष्ट असतात. (कारण फळ पिकताना त्याच्या अंतर्गत घडणाऱ्या क्रिया घडून येण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसतो.) मात्र चवीवर आधारलेली ही पद्धत वापरण्यासाठी फळ चाखणाऱ्याला चवी-चवीतला फरक ओळखता यायला हवा.