1

Topic: दिनमानातील बदल

दक्षिणायन व उत्तरायणात दिनमानातील बदल सूर्योदय व सूर्यास्त बाजूकडून सारख्याच फरकाने होत नाही. असे का?

2

Re: दिनमानातील बदल

आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर कृपया थोडेसे स्पष्टीकरण द्यावे.
१) आपल्या प्रश्नात आपण ‘सूर्योदय व सूर्यास्ताच्या बाजूने’ असे म्हटले आहे. हे एखाद्या उदाहरणासहित स्पष्ट करावे. म्हणजे उत्तर देणे सोपे ठरेल.
२) आपण उल्लेखलेले दक्षिणायन-उत्तरायण हे आपल्या मराठी पंचांगातील पंचांगातील दक्षिणायन-उत्तरायण आहे का?
धन्यवाद.

3

Re: दिनमानातील बदल

१) रवि उदयास्ताच्या वेळा संदर्भासाठी दाते पंचांग शके १९४१ मध्ये  ज्येष्ठ क्रुष्ण वआषाढ शुक्ल पक्ष,तसेच पौष क्रुष्ण व माघ शुक्लपक्ष यातील रवि उदयास्त पहावे, म्हणजे लक्षात येईल.
२) दक्षिणायन उत्तरायण यांचे दिनांक चांद्र/सौर पंचांगात/दिनदर्शिकेत एकच आहेत.

4

Re: दिनमानातील बदल

आपली शंका स्पष्ट झाली आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

आपण सर्वत्र भारतीय प्रमाण वेळेचा वापर करतो. भारतीय प्रमाण वेळ ही ८२.५ अंश (पूर्व) या रेखांशाशी निगडित केली गेली आहे. (उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या गावाचे हे रेखांश आहेत.) मात्र प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ ही या भारतीय प्रमाण वेळेपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ, आपल्या घड्याळात दाखवली जाणारी वेळ (भारतीय प्रमाण वेळ) आणि मुुंबईची स्थानिक वेळ यात सुमारे चाळीस मिनिटांचा फरक आहे. जेव्हा भारतीय प्रमाण वेळ सकाळचे सात वाजल्याचे दर्शवत असते, तेव्हा स्थानिक वेळेनुसार मुंबईत फक्त सहा वाजून वीस मिनिटे झालेली असतात. याच गणितानुसार भारतीय प्रमाण वेळेनुसार जेव्हा बारा वाजून चाळीस मिनिटे होतात, तेव्हा मुंबईची स्थानिक वेळ बारा (मध्यान्ह) इतकी असते.

हे गणित रोजच्या दिनमानाला लागू होते. तेव्हा दिनमानाच्या गणितासाठी प्रथम भारतीय प्रमाण वेळेचे रूपांतर त्यात्या ठिकाणच्या स्थानिक वेळेत करावे. त्यानंतर सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा काढाव्या. असे केल्यास सूर्योदय व सूर्यास्त हे मध्यान्हीच्या दोन्ही बाजूस साधारणपणे सारख्याच कालावधीनंतर यायला हवेत.

5

Re: दिनमानातील बदल

प्रमाणवेळ__ भारताची प्रमाणवेळ ८२.५ अंश पूर्व रेखाव्रुत्तावर  मध्यान्ह १२.०० अशी  अविचल आहे. हे ग्रुहीत. त्यानुसार मुंबईला मध्यान्ह १२__३९ अशी अविचल. रोजचे रविउदय _ मध्यान्ह_ रविअस्त असे पूर्वान्ह व अपरान्ह शके १९४१ चे पंचांगावरुन बघितले तर खालील चित्र दिसते. विस्तारभयास्तव  दक्षिणायनातील पूर्वान्ह व अपरान्ह यातील  जास्तीतजास्त फरक व शून्य फरक येवढेच घेतले आहेत. दिनांक इंग्रजी.
दिनांक  दिनमान.    र.उ.         र.अ.      पूर्वान्ह.     अपरान्ह   फरक
१४/६.   १३_१४  ६_०२      १९_१६     ६_३७       ६_३७.      ०
२१/६.    १३_१४. ६_०३.     १९_१७.    ६_३६.      ६_३८.   -०२
२६_७.     १३_०१. ६_१५.     १९_१६.    ६_२४      ६_३७.    -१३
३०/८.     १२_३०.  ६_२४.    १८_५४.     ६_१५.     ६_१५.     ०
२३/९.      १२_०४.  ६_२९.    १८_३३.    ६_१०.      ५_५४.  +१६
१/११.      ११_२४.  ६_४०.     १८_०४.   ५_५९.      ५_२५   +३४
८/११.       ११_१८. ६_४३.      १८_०१.   ५_५६.     ;५_२२   +३४
२२/१२.     १०_५७. ७_०८.      १८_०५.   ५_३१.      ५_२५.  +०६
२७/१२.      १०_५७. ७_११.      १८_०८   ५_२८.      ५_२८.    ०
यात असे दिसते कीं पूर्वान्ह  अडीच महिने व अपरान्ह चार महिने मोठा.दक्षिणायन सुरु झाल्यावरसुद्धा रविअस्त उशिराच होत रहातो,  १४ जुलै पर्यंत. तसेच उत्तरायण सुरु झाल्यावर रविउदय उशिराच होत रहातो, २५ जानेवारीपर्यत. हे कसे?