1

Topic: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

परिषदेतर्फे दरमहा प्रकाशित होणारे 'मराठी विज्ञान परिषद पत्रिका' हे नियतकालिक आता संकेतस्थळाच्या 'पहिल्या पाना'वर संपूर्णपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. PDF स्वरूपात उपलब्ध करून दिले जात असलेले हे मासिक स्वरूपातले नियतकालिक त्या त्या महिन्यापुरते संकेतस्थळावर उपलब्ध असेल. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त विज्ञानप्रेमींपर्यंत पोचावा अशी परिषदेची इच्छा आहे.

2

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

चांगला उपक्रम...
परिषदेने पूर्वीचेही काही अंक PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास वाचकांना ते निश्चितच उपयोगी ठरतील.
मात्र याबरोबरच विज्ञानप्रेमींनी छापील स्वरूपातील पत्रिकेची वर्गणी भरून परिषदेच्या कार्यास प्रत्यक्ष हातभार लावावा.

3

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

'पत्रिके'चे पूर्वीचे अंक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली गेली आहे. जानेवारी २००७ पासूनचे अंक 'पत्रिका' या संकेतपृष्ठावर उपलब्ध आहेत.

परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे विज्ञानप्रेमी वाचकांनी परिषदेचे सभासदत्व घेऊन आणि/किंवा छापील स्वरूपातील पत्रिकेची वर्गणी भरून परिषदेच्या कार्यास प्रत्यक्ष हातभार लावावा ही अपेक्षा.

4

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

भारताबाहेरील लोक internet वरुन वर्गणी भरुन मदत करु शकतात का?

5

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

परिषदेत इंटरनेटवरून वर्गणी भरण्याची सोय अजुन केली गेलेली नाही. (कालांतराने ती केली जाईलही.) भारतातल्या भारतात बँकेमार्फत (ibankng) वर्गणी भरता येते. परंतु भारताबाहेरून वर्गणी कशी भरावी यासंबंधी आपल्याला लवकरच माहिती दिली जाईल. आपण पत्रिकेची वर्गणी भरून परिषदेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्याबद्दल आभार.

6

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

श्री. तुषार,
आपल्या वैयक्तिक ई-मेल पत्त्यावर या संदर्भात आपल्याशी संपर्क साधला आहे.
धन्यवाद!

7

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

मराठी विज्ञान परीषद पत्रिका कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ?

8

Re: मराठी विज्ञान परिषद पत्रिका आता संकेतस्थळावर...

मराठी विज्ञान परिषद पत्रिकेसाठीच्या संकेतपृष्ठाची जोडणी बाजूच्या उभ्या स्तंभात दिली आहे. साधारणपणे दोन वर्षांपूर्वीचे संपूर्ण अंक हे या संकेतपृष्ठावर उपलब्ध करून दिले जातात.

- प्रशासक (विज्ञानपीठ)