1

Topic: जीवनाची निर्मिती

जीवनाची निर्मिती  हा काही दैवी चमत्कार नाही. विशिष्ट भौतिक परिस्थितीतून निसर्गनियमानुसार जीवनाची निर्मिती झाली आणि अशीच परिस्थिती जेथे असेल तेथे जीवसृष्टी निर्माण होणे शक्य आहे. लवकरच प्रयोगशाळेत पृथ्वीच्या इतिहासातील प्राथमिक जीवांची निर्मिती शास्त्रज्ञ करू शकतील, यात शंका नाही. ते झाले की मग जीवनाच्या उत्पत्तीविषयीच्या वादाचा अंत होईल.
जीवन हा प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे. विघटन -पुनरघटन या क्रियेत बाहेरील निसर्गाशी अखंड देवघेव करणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. आणि ही क्रिया थांबताच जीवनाचा अंत होऊन प्रोटीनचा नाश होतो. अलीकडच्या काळातील जीवशास्त्र व रसायनशास्त्र यांतील प्रगती असे सांगते की, जीवांचे पुनरुत्पादन,अनुवंशिक लक्षणांचे सातत्य आणि शरीरातील विभिन्न प्रोटीनची निर्मिती यांबाबत मुख्य भूमिका D.N.A. म्हणजे डी- ऑक्सी -रायबो - न्यूक्लिक आम्ल द्रव्याची आहे. त्यामुळे "जीवन हा न्यूक्लिक आम्ल (D.N.A.) आणि प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे" असे म्हणता येईल. D.N.A. चा स्वतःभोवती गिरक्या घेणारा लांबच्या लांब देखणा रेणू हा पृथ्वीतलावरील रेणूंच्या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट आहे. "आपण निर्जीवांपेक्षा श्रेष्ठ "असा टेंभा मिरवणाऱ्या सर्व सजीवांच्या अस्तित्वाला कारणीभूत ठरणारा आहे. प्रत्येक सजीवाच्या उत्प्पती - वाढ -लय या अवस्थांचा सूत्रधार आहे.आज्ञावलींचा गुप्त खजिना पिढ्यानपिढ्या त्याने आपल्या पोटात सांभाळला आहे. पेशीच्या केंद्रस्थानी बसून D.N.A. आज्ञा सोडतो आणि त्याप्रमाणे प्रोटीनची निर्मिती होऊन शरीराचे कामकाज चालू राहते.

2

Re: जीवनाची निर्मिती

Processes of formation of life on this planet is a series of reactions that are riddle to todays to science. As we go beyond the micro science to nano science still we discover the new dimensions and new fields. we are now close by discovering the new field  called as active matter. This field that deals with the interaction of molecules and atoms with mathematical rules, energy rules,and moving rules of their own. The discovery of active matter will give the fundamental theory of the living world.

3

Re: जीवनाची निर्मिती

माझं हि मत ह्या मध्ये 2 जणांचे विषय आहेत.
1. जीवनाची निर्मिती (शिरीष कुंभारकर)
2. देहभान (Science Lover)
जीवनाची निर्मिती – उत्क्रांती ते देहभान किंवा स्व – भान (consiness) ह्या दोन विषयांमध्ये अनेक प्रश्नांची मालिका निर्माण होते. जीवशास्त्राचे प्रश्न भौतिकशास्त्रापेक्षा ज्यास्त गहन वाटतात.
मी सध्या 2 प्रश्न मांडतो आणि ते प्रयोगाने सिद्ध होवू शकतात का?
निर्मितीच्या प्रक्रिये मध्येच स्व भान हे अंगभूत असत का?
कोणत्याही सजीवाच्या मृत्यूनंतर जो काही निर्जीव पदार्थ शिल्लक राहतो त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान वाढत असत का?

उदय नागांवकर