1

Topic: तेजोमेघांची निर्मिती कशी झाली??

तेजोमेघांची निर्मिती कशी झाली??व त्यांचे तापमान व आकार एवढा मोठा कसा??

2

Re: तेजोमेघांची निर्मिती कशी झाली??

तेजोमेघ हे विविध प्रकारचे असतात.

( १) आंतरतारकीय वायू व धुळीचा मेघ – यातून तारे जन्माला येतात. अशा तेजोमेघाचं तापमान काही लक्षावधी अंशांइतकं प्रचंड असू शकतं. जन्माला येणार्‌या तार्‌यांकडील उष्णतेमुळे हे तापमान इतकं उच्च असतं. अशा तेजोमेघांचा आकार कित्येक प्रकाशवर्ष असू शकतो. 

(२) ग्रहीसदृश तेजोमेघ – तार्‌यांच्या मृत्युपूर्व स्थितीत त्याचं वायुमय बाह्य आवरण हळू हळू प्रसरण पावत अंतराळात पसरतं. हे आवरण म्हणजेच ग्रहसदृश तेजोमेघ. पसरणार्‌या वायुमुंळे छोट्या दुर्बिणीतून हे तेजोमेघ ग्रहाच्या चकतीसारखे दिसतात. यामुळे अशा तेजोमेघाला ग्रहसदृश तेजोमेघ म्हणतात. केंद्राशी असणारा तारा अशा तेजोमेघाला उष्णता पुरवतो. अशा तेजोमेघाचं तापमान कित्येक हजार अंश सेल्सियस इतकं असू शकतं. याचा आकार एक प्रकाशवर्ष इतका असू शकतो.

(३) तार्‌यांच्या मृत्युद्वारे निर्माण होणारा तेजोमेघ - वजनदार तार्‌यांचा मृत्यु हा स्फोटक असतो. अशा मृत्युच्या वेळी तार्‌याचा गाभा आकुंचन पावतो, तर गाभ्याबाहेरील वायू स्फोटाच्या स्वरूपात बाहेर फेकले जातात. हे वायू आपल्याला तेजोमेघाच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. या तेजोमेघांचं सुरूवातीला कोट्वावधी अंश असलेलं तापमान हे हळू हळू कमी होत होत, काही हजार अंशांपर्यंत उतरतं. अशा तेजोमेघांचा आकार काही प्रकाशवर्ष असू शकतो.