1

Topic: मातीतील बारीक गोगलगायी

नमस्कार.  आमच्या garden मधील मातीत बारीक conical गोगलगायी झाल्या आहेत.  त्या कशामुळे होतात व त्या नष्ट करण्यासाठी काय करावे ? प्रत्येक शंख वेचून काढणं अशक्य आहे.  आणि बारीक अंड्यांतून पुन्हा नवीन गोगलगायी निर्माण होऊ शकतात. ह्यावर काही खात्रीलायक व permanent उपाय आहे का ?

2

Re: मातीतील बारीक गोगलगायी

सप्रेम नमस्कार,

आपण विचारलेल्या प्रश्नाला परिषदेचे कार्यवाह आणि ‘शहरी शेती’ या विषयातील तज्ञ श्री. दिलीप हेर्लेकर यांनी उत्तर पाठवले आहे. ते खाली देत आहे.

“गोगलगायींची सुरुवात म्हणजे बारीक शंख. ते जास्त ओलसर मातीत होतात. झाडे लावतो तिथे ही परिस्थिती टाळावी. बहुतेक सर्व वनस्पती मर्यादित पाण्यात वाढतात. पाण्याची जास्त गरज असलेल्या आपल्याकडील वनस्पती म्हणजे ऊस , केळी आणि भात पीक. इतर कोणत्याही वनस्पतीला जास्त पाणी लागत नाही. पाणी द्यायचे का नाही याकरीता एक छोटी युक्ती आम्ही वापरतो. झाड ज्या मातीत असेल तिथे आपले कोरडे बोट टेकवायचे. आपल्या बोटाला ओलसरपणा जाणवला आणि बोटाला माती चिकटली नाही की पाणी पुरेसे आहे असे समजावे. याप्रकारे तपासून पाणी दिल्यास गोगलगायीना अनुकूल परिस्थिती निर्माण होणे टाळता येईल. पण गोगलगायी झाल्यास मात्र त्या plucker वापरून वेचाव्या आणि रॉकेलमध्ये टाकून माराव्या. मारण्याचे आणखी काही उपाय असतील तर ते करावे. गोगलगायी खूप खादाड असतात, त्यामुळे त्यांना वाढू देणे आपल्या झाडासाठी धोकादायक असते.”

- प्रशासक