1

Topic: वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती

वनस्पती वेगवेगळ्या रोग व किडी यांचे नियंत्रण नैसर्गीक रित्या कसे करतात?

2

Re: वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती

प्रश्ना मध्ये विशिष्ट वनस्पतीचा उल्लेख नसल्याने याचे उत्तर अधिकच सर्व साधारण होईल. कारण वेगवेगळ्या वनस्पती रोग व किडीपासून स्वताचा बचाव वेगवेगळ्या पद्धतीने करतात.
उदा.
१. काही झाडांवर रस शोषण करणाऱ्या किडी आढळतात. अश्या वेळेस, वनस्पतीच्या ज्या पानावर कीड आहे अश्या पानाची घडी किंवा सुरळी करतात. याद्वारे किडीला वनस्पतीच्या इतर भागापासून वेगळे केले जाते. वड, पिंपळ, शोभेच्या वनस्पतीमध्ये सुरळी झालेली पाने उघडून पाहिल्यास आपल्याला याची खात्री करता येते.
२. पानावर विशिष्ट जातीचे जीवाणू किंवा बुरशीची वाढ झाल्यास वनस्पती आपल्या शरीरात अल्कालोईड (alkaloids) तयार करून स्व-रक्षण करतात. बऱ्याचदा रोगाचा प्रादुर्भाव झालेला भाग वनस्पती काढून टाकतात किंवा पानाचा असा भाग अलग केला जातो. काही वनस्पतींच्या पानावर रोग प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या ठिपक्या भोवतीच्या पेशी मृत होतात आणि तो भाग खाली गळून पडतो. यामुळे पानावर विशिष्ट आकाराची छिद्रे तयार होतात.

3

Re: वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती

Plants get sick. That is, they can be infected by pathogens. But after hundreds of millions of years of pathogen attacks, plants are still here. So, they must have ways to get well after being sick.Plants don’t have antibodies or special cells that search for and destroy pathogens.Plants also possess inducible systemic defense responses when locally infected by pathogens.Local defensive responses included the so-called “hypersensitive response” characterized by the self-destruction of the plant cells in a localized area around the site of infection.