1

Topic: पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे

सध्या  सर्व शहरात सोसायट्यामध्ये बिल्डींगच्या भोवताली कॉंक्रिटचे अथवा पेवरब्लोक चे आच्छादन घातलेले असते त्यामुळे मोकळी जमीन फारच कमी उपलब्ध असते. पावसाळ्यात पडणारे पाणी ह्या आच्छादलेल्या भागावरून वाहून लगेच गटारांना / नाल्यांना मिळते त्यामुळे पावसाचे पाणी खूपच
कमी जमिनीत मुरते आणि पाण्याची जमिनी खालील पातळीत काहीच वाढ होत नाही.
जर का आपण गच्चीतून येणाऱ्या पाण्याच्या पाईप च्या खाली अथवा बाजूला ५० ते १०० फुट बोअर घेतली आणि पाणी त्यात सोडले तर गच्चीतील पाणी लगेच केलेल्या बोअर मधून ५० ते १०० फुट खोलवर जाईल व तेथे मुरायला सुरवात होईल.तसेच जाताजाता पूर्ण ५० ते १०० फुट जमिनीत आजूबाजूला मुरायला लागेल जेणे करून गच्चीतील पावसाचा प्रत्येक थेंब आपण जमिनीत मुरवून पाण्याचे पुनरभरण करू शकू.त्यामुळे जमिनी खालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल व आपल्या बोअरना जास्तीतजास्त पाणी मिळेल तेसुद्धा शुद्ध पावसाचे.
सोसायटीच्या बाजूच्या जमिनीचा उतार देखील आपण ह्या बोअर कडे वळवल्यास जास्तीतजास्त पाणी गटारांना न मिळता जमिनीत मुरवू शकू.
असे बोअर बिल्डींगच्या चारही बाजूंना बिल्डींग पासून लांब / दूर घ्यावेत कारण उंदीर व घुशी ह्यांचा त्रास होणार नाही.
जरका आपल्या महानगरपालिकांनी  / नगर परिषदांनी सर्व सोसायट्यांना कम्पल्सरी केले तर हे सर्व लवकर होईल.
गाव गावात देखील प्रत्येक घराला पन्हाळे लावून वरील प्रकारचे नियोजन केले तर तेथील बोअर ना / विहिरींना पाणी जास्त उपलब्द्ध होईल ह्या साठी सरकारने त्यांना मदत करावी.
प्रशांत गुप्ते
९३२४०३७८२८ ठाणे

2

Re: पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे

हा उपाय एकदम मस्तच आहे. एक सूचना. बोअरवेलच्या आत  न गंजणार्या धातूची मजबूत जाळी लावून उंदीर घुशींचा संभाव्य उपद्रव टाळता येईल.
--मुग्धा रिसबूड, ठाणे.

3

Re: पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे

पावसाचे  पाणी जमिनीत मुरवणे अतिशय आवश्यक बनले आहे . सध्या जमिनीची पाण्याची पातळी खूपच खालावलेली आहे. शेतामध्ये जागोजागी बांध घालून शेततळी तयार केली पाहिजेत . विहिरींचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. सरकारने ' जलयुक्त शिवार ' ही योजना राबवली आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जर वाचवता आला तर भारत सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.