1

Topic: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

मराठी वैज्ञानिकांचे नाव जरी ऐकले तरी माझी छाती फुगून वर येते पण दुसर्याच क्षणी त्यांची संख्या पाहून छाती पुन्हा खाली येते.
आपल्याकडे संशोधनाला महत्व दिलं  जात नाही किंवा कुतूहलापोटी प्रश्न चावून-चगलुन फेकून दिले जातात. आज ज्यांच्या हाती उद्याचे वैज्ञानिंक घडवण्याची जिम्मेदारी आहे ते स्वतः हात माघे का घेत आहेत. फक्त पैसा कमावण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे हे आजच्या विद्यार्थ्यांच्या रक्तात उतरवल  जात आहे. मविप सारख्या संस्था जास्त का नाहीत ? एकटी मराठी विज्ञान परिषद लढत आहे , पण हे असच चालू राहिले तर दहा वर्षानंतर आपला महाराष्ट्र किती नवीन वैज्ञानिक जगाला  देऊ शकेन.?

2

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

The concern posted above has to be looked in seriously. एकटी मराठी विज्ञान परिषद लढत आहे , पण हे असच चालू राहिले तर दहा वर्षानंतर आपला महाराष्ट्र किती नवीन वैज्ञानिक जगाला  देऊ शकेन.?. What needs to be done.  by p p  pathak

3

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

मराठी विज्ञान परिषद हे विज्ञान प्रेमिसाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे. मात्र अनेकजणांना मराठी विज्ञान परिषदेविषयी माहीतच नाहि. यावर काहीतरी उपाय करायला हवा.

4

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

आपण म्हणता ते दुर्दैवाने खरे आहे...

मराठी विज्ञान परिषद आपल्या उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती वर्तमानपत्रे, आकाशवाणी यासारख्या माध्यमांद्वारे तसंच आपल्या स्वतःच्या संकेतस्थळावरून सतत प्रसृत करीत असते. लोकसत्ता या दैनिकाने तर इ.स. २०१२ साली 'सर्व कार्येषु सर्वदा' या उपक्रमाच्या अंतर्गत परिषदेच्या कार्याबद्दल पानभराचा मजकूर छापला होता. गेली काही वर्षे परिषदेद्वारे लोकसत्तेतील कुतूहल हे दैनिक सदरही चालवले जात आहे. याशिवाय आपल्या सत्तरहून अधिक विभागांद्वारे परिषद सर्वदूर पोचण्याचाही प्रयत्न करीत आहे. इतकं असतानाही जर लोक परिषद-विषयक बातम्यांकडे दु्र्लक्ष करीत असतील तर हा दोष समाजाच्या विज्ञानाकडे पाहाण्याच्या एकूणच निरूत्साही दृष्टिकोनाचा तर नसावा?

5

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

Marathi vidnyan atishay changla upkram rabvat ahe, Maharashtrat vaidyanikanchi kami nahi pratyek shetrat kityek vaidnyanik mahrashtra ne dile ahet ani divsen diwas he praman vadhat ani. Khari garaj ahe ti vadnyanikanchi galti maharashtratun thambavnyachi aaj aple kityek vaidynyanik baherchya deshat ucch pratiche sanshodhan karat ahet, tyana hi as watt ki aply desha sathi kiva aplya samajasathi he sanshodhan appan aplya deshat karav pan mage valun pahil tar partichya vata far thodya ahet. Ani ya vatan madhe hi pratyek valnala ani shanala politics bharl ahe. Vaidyanikana sanshodhan sodun adhi ithe politics shikav lagt mothe contacts banvave lagtat ani tevha kuthe te swatacha as kahi tar sanshodhan ithe karu shaktat. Alikadech sanshodhanala protsahan denya sathi sarkar ne kahi navin upkram rabvle ahet jase DST INSPIRE program, UGC faculty recharge program pan yathi kiti lok bina kunchya olkhine ya positions milu shakta ya babat shankach ahe. Tari garaj ahe ti velich yogya paul uchalun aplyach sanshodhakana ghari partnya sathi politics virahit vat milun denyachi.

6

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

खरे तर मराठीत 'विज्ञान नाटिका' निर्मित होण्याची खूप गरज आहे. एक तर नाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. आणि गावोगावी उत्सुक पण खूप असतात नाटक बसवणारे. लहान मुले फार ओढीने नाटकांत भाग घेतात.
तथापि विपुल प्रमाणात विज्ञान नाट्य निर्मिती झाल्यास विज्ञान प्रसार खूप सोयीचा होईल. मराठी विज्ञान लेखकांनो, इकडे लक्ष द्या.  (मी देखील या अवघड प्रकारात हात घालण्याचा प्रयत्न करणार आहे. तसा संकल्प केलाय मी या वर्षी. पण मी काही रेग्युलर लेखक नसल्याने माझे प्रयत्न फारच थोकडे पडतील.)

7

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

'santoshsaraf' यांनी व्यक्त केलेले मत हे निश्चित महत्त्वाचे आहे. त्यानिमित्ताने ही थोडीशी माहिती.

'विज्ञान प्रसार' ही दिल्लीस्थित शासकीय संस्था आकाशवाणीवरून विविध वैज्ञानिक विषयांवर मालिका सादर करते. नाटिकांच्या स्वरूपात असणाऱ्या या मालिका प्रत्येक राज्यातून त्या त्या राज्याच्या भाषेतून सादर केल्या जातात. महाराष्ट्रात अर्थातच त्या मराठीतून सादर केल्या जातात. सध्या चालू असलेली मालिका ही गणित या विषयावर आधारलेली आहे. या मालिकेची  वेळ दर रविवारी सकाळी ०९.३० ते १०.०० अशी असून ती महाराष्ट्रातील सर्व प्रमुख आकाशवाणी केंद्रांवरून ती सहक्षेपित केली जाते. मराठीतील या मालिकेचे लिखाण NCSC (नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स) या संस्थेतर्फे केले जाते.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

8

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

Dear All,

When I was kid my dream was to became Scientist I read few books on science, I never got good resources and guidance because so many reason...Now I am an Engineer.

Today While reading marathi(MATA) news paper I came to know MAVIPA, it's very good initiative taken by those grt people. But in modern generation interest in science is very less because of external factors and awareness of science in society.

My small suggestion can we spread this information about MAVIPA at micro level in society(Specially Rural area), in rural area still internet and news paper are not common compare to Urban area. Can we use social media.

9

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

संशोधनासाठी मार्गदर्शन मिळ नाही ही शोकांतीका आहे

10

Re: महारष्ट्रातील संशोधन आणि मराठी वैज्ञानिक

मला वाटतं,  सध्या सोशल नेट्वर्किंगचा जमाना आहे. Whatsapp,Facebook.Twitter यांसारख्या माध्यमांमधून प्रचंड प्रमाणात communication चालू असते. मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञानपीठाची जाहिरात आपण सर्वानीच ह्या माध्यमांतून केली पाहिजे. किंवा विज्ञानपीठाच्या नावानी एक Whatsapp group फॉर्म केला पाहीजे.तसा काही group असल्यास site वर त्याची माहीती प्रसारीत केली पाहीजे.