1

Topic: भारताचे स्वत:चे कालमापन

नमस्कार ,
काही वर्षा पूर्वी मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाच्या वेब पेज वर, भारताचे स्वत:चे कालमापन या विषयावर लेख वाचला होता . आज आमच्या कार्यालयात काही पत्रकात नमूद करण्या साठी भारतीय सौर दिनांक लिहायचा होता. त्यानिमित्ताने अर्थात इंटरनेट वर शोधाशोध सुरु केली तेव्हा अनेक ठिकाणी आजचा किंवा फारतर सरकारी सुट्टीच्या दिवशीचा भारतीय सौर दिनांक सापडला.  परंतु २०१७ ची पूर्ण अशी  भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका कुठे सापडली नाही की  ज्यामध्ये  ग्रेगोरियन कॅलेंडर चा अमुक एक दिनांक, म्हणजे हा भारतीय सौर दिनांक असे प्रमाणित रीतीने लिहिले आहे.   मग मराठी कालनिर्णय च्या पाठी पंचांग चा एक तक्ता आहे त्यात शेवटच्या रकान्यात राष्ट्रीय शीर्षका खाली मराठी महिन्याचे नाव आणि आकडे दिलेले आहेत तिथे फाल्गुन महिना छापला होता तोच प्रमाणित धरावा तर समोरच्या तारखांप्रमाणे फाल्गुन महिना २ दिवसं नंतर सुरु होताना दिसत होता.  पुणे विभागाच्या ब्लॉग वर एक चांगला तक्ता दिला आहे तो प्रमाणित केलेला आहे का? किंवा दर वर्षा ची प्रमाणित अशी  भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका भारत सरकार तर्फे  छापील स्वरूपात किंवा इंटरनेट वर इतर कोठे उपलब्ध असल्यास त्याचा पत्ता मला मिळेल का की जेणे करून त्या लेखात लिहिल्या प्रमाणे  दैनंदिन व्यवहारात भारतीय सौर दिनांक वापरणे सोपे होईल.

2

Re: भारताचे स्वत:चे कालमापन

नमस्कार,
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ग्रे.दिनदर्शिकेवरुन तयार करणे अतिशय सोपे आहे....
उदा. भा.रा. दिन. दि. २२ मार्च २०१७ (ग्रेगोरियन दिनदर्शिका) पासुन सुरु होवून २१ मार्च २०१८ ला संपेल.

दि. २२ मार्च २०१७ रोजी भा.रा. दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शु. प्रतिपदा/पाडवा असतो व रोज एक तिथी याप्रमाणे २१ मार्च २०१८ ला फाल्गुन अमावस्या असेल........ व साल/शक हे शालिवाहन असते........
यामधे देखिल चैत्र ते भाद्रपद ३१ दिवसांचे तर उर्वरित(अश्विन ते फाल्गुन ३० दिवसांचे) असतात......
तसेच हि सौरदिनदर्शिका असल्याने तिथी मध्यरात्रि १२:०० वाजता बदलते.......

या तिथी व कालनिर्णय (किंवा इतर कोणत्याही) दिनदर्शिकेतील तिथींची तुलना करु नये.......

कारण कालनिर्णय इ. मधिल तिथी या चांद्र महिन्यावर/ चांद्रदिनावर आधारित असतात तर भा.रा.दि. मधिल सौरदिनावर आधारित असतात.....


ही दिनदर्शिका रोजच्या वापरात का नाही!?

कारण

आपले सण हे चांद्र महिन्यावर आधारित असतात उदा. कोजागिरी पौर्णिमा.व हा चांद्र महिना २७ दिवस + काहितास (चंद्राच्या परिभ्रमण काळाएवढा) असतो.
पण भा रा दि. मधे सौर दिनदर्शिका वापरली आहे ज्यामधे महिना पूर्ण ३०( ग्रेगारियन दि. प्रमाणेच) असतो.......
त्यामुळे सौर दिनदर्शिकेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ७ आॅक्टो या दिवशी भलतीच तिथी असु शकते.......
उदा. ७ आॅक्टो., २०१६ रोजी सौर कालगणनेप्रमाणे अश्विन पौर्णिमा होती पण चांद्र महिन्याप्रामाणे अश्विन शु. षष्ठी (६) होती......
व याप्रमाणे दरवर्षी फरक वेगळा असतो जसा २०१७ मधे फक्त २ दिवसांचा फरक आहे......

व आपले चांद्र महिन्यातील अधिक मास लक्षात घेता अमावस्याही येऊ शकते.

3

Re: भारताचे स्वत:चे कालमापन

माहिती बद्दल धन्यवाद !