1

Topic: solar energy

Hi,
I need some information regarding solar energy and applications.
I have a medium sized open-to-sky gallery in my home and it receives direct sunlight for about 6-8 hours a day. I want to make use of this solar energy.

I am willing to buy a solar cooker. I a requesting help regarding below :

1. Addresses of shops from where solar cooker can be purchased.I stay in thane.
2. Kindly suggest any other solar instruments I can be benefited from.
3. Is there any provision from government institutions or any other department which gives subsidy to domestic / non commercial users to encourage use of solar energy ? If anyone has information, kindly let me know.
4. If any members have used / are using solar appliances at their home, I will be happy to hear their experiences/suggestions.

Thank you.

-Tejas Athavale.

2

Re: solar energy

even I need answer to my following questions asked previously
खिडक्या किंवा गॉलरी च्या पत्र्यांवर सोलर panel लावले तर त्यापासून मिळणारी उर्जा वापरून साधारण कोणती विजेची  उपकरणे चालू शकतात? सोलर panal लावून मिळवलेली उर्जा लगेच वापरावी लागते का ? की  ती कितीही  वेळ साठवून ठेवता येते ?  विशेषतः Microwave  Oven  किंवा AC हि उपकरणे चालण्या साठी खूप वीज खर्च होते . सोलर Panel लावून ती उर्जा inverter battery  मध्ये साठवून फक्त हि उपकरणे चालू शकतात का?

3

Re: solar energy

we can store the light energy by solar panels in the form of electrical energy.
we can store these energies in the batteries.

4

Re: solar energy

डॉ. सुधीर पानसे यांनी वरील प्रश्नाला दिलेले उत्तर खालीलप्रमाणे आहे.

सोलर पॅॅनल लावून वीज निर्माण होते. 'विजेवर चालणारी कोणतीही उपकरणे या विजेवर चालवता येतील का?' या प्रश्नाचे मूळ उत्तर असेल 'होय! हे शक्य आहे.' त्या विजेवर मायक्रोवेव्ह चालू शकेल, एसी चालू शकेल, फ्रीज किंवा पाण्याचा पंपही चालू शकेल. हे तत्वतः आणि तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे. प्रश्न असा आहे की त्यासाठी सोलर पॅॅनलचे क्षेत्रफळ किती लागेल? मायक्रोवेव्ह किंवा एसी साठी १000 ते १५००  वॅॅट या दराने ऊर्जा पुरवावी लागेल. १००० वॅॅट ६ तास मिळण्यासाठी मुंबईत सोलर पॅॅनलचे  सुमारे ११ मी वर्ग एवढे क्षेत्रफळ लागते. (ऊर्जा साठवून २४ तास वापरायची असल्यास ४पट क्षेत्रफळ लागेल.) जर खिडक्या किंवा गॅॅलरी यांच्यावर इतक्या क्षेत्रफळाचे पत्रे असतील (आणि ते दक्षिणाभिमुख  असतील) तर पुरेशी वीज तयार होईल व त्यावर मायक्रोवेव्ह व एसी चालवता येऊ शकेल.
पण प्रत्यक्षात  खिडक्या किंवा गॅॅलरी यांच्यावर इतक्या क्षेत्रफळाचे पत्रे असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे कमी वीज लागणारी उपकरणे त्यावर लावता येतील. (जसे विजेचे दिवे, ज्यांना ६० ते १०० वॅॅट वीज लागते.)
वीज साठवून ठेवणे हेही तत्वतः आणि तांत्रिक दृष्ट्या सहज शक्य आहे. पण यासाठी लागणाऱ्या बॅॅटरीची किंमत व त्या  बॅॅटरीचे आयुष्य यांचा विचार करता, ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करूनच सोलर पॅॅनल शक्यतो गच्चीत बसवतात, आणि सोलर विजेची ग्रीडशी जोडणी करतात. सोलर वीज जेवढी जास्त निर्माण होते, तेवढी ग्रीडची वीज कमी वापरली जाते. म्हणजे परिणाम असा की जणू विजेची बचत होते, आणि त्यासाठी फार खर्च करावा लागत नाही.

- प्रशासक (विज्ञानपीठ)