1

Topic: कीड नियंत्रण

माझ्याकडच्या जास्वंदीच्या झाडावर कापसासारख्या कोषात कसलीतरी कीड पानांच्या बेचक्यांतून येते आहे आणि तिचा भयानक प्रादुर्भाव होऊन झाडाची वाढ खुंटते आहे. हाताने वेचायला गेले तर  कोवळे कोंभ तुटतात. खात्रीलायक उपाय सांगावा. आता तर ती पानांच्या पृष्ठभागावर येऊन पाने पिवळी पडायला लागली आहेत. खूप दिवसांपासून फक्त जास्वंदीच्याच रोपाला या रोगाने हैराण केलेले आहे.

2

Re: कीड नियंत्रण

हि कीड म्हणजे लोकरी मावा असावा. त्याची खात्री झाल्यास, बाजारात उपलब्ध विविध कीटक नाशकांचा वापर करून आपणास हि कीड नियंत्रणात आंत येईल.