1

Topic: पत्रिकेतील लिखाणासंबंधी

माझ्या सारख्या नवीन विज्ञानलेखकांना आपले साहित्य 'मराठी विज्ञान पत्रिकेमध्ये प्रसिद्ध करता येईल काय?

2

Re: पत्रिकेतील लिखाणासंबंधी

माझ्या सारख्या नवीन विज्ञानलेखकांना आपले साहित्य 'मराठी विज्ञान पत्रिके'मध्ये प्रसिद्ध करता येईल काय?

त्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल ?

3

Re: पत्रिकेतील लिखाणासंबंधी

पत्रिकेत छापले जाणारे बहुतेक लेख विविध विषयांतील तज्ज्ञांकडून मागवलेले गेलेले लेख असतात. हे लेख वैज्ञानिक क्षेत्रांत होणाऱ्या ताज्या घडामोडी, नवे संशोधन, नवे तंत्रज्ञान यासंबंधीच्या माहितीवर आधारलेले असतात.

मुद्दाम मागवलेल्या या लेखांव्यतिरीक्त पत्रिकेकडे वैयक्तिकरीत्या पाठवलेले काही लेखही येतात. मात्र असा लेख स्वीकारार्ह आहे की नाही हे संपादक मंडळ ठरवते. लेखांची स्वीकृती ही लेखातील माहितीचा दर्जा, विश्वासार्हता, वाचनीयता अशा अनेक मुद्द्यांवर आधारलेली असते.

काही वेळा पत्रिकेकडे आपणहून पाठवलेल्या लेखांपैकी काही लेख हे लेखकाने स्वतः केलेल्या संशोधनावरही आधारलेले असतात. पत्रिका हे वैयक्तिक संशोधनास प्रसिद्धी देणारे नियतकालिक नसल्याने अशा लेखांना सहसा प्रसिद्धी दिली जात नाही.

लेखाची स्वीकृती वा अस्वीकृती हा संपूर्ण संपादक मंडळाने एकत्रितपणे घेतलेला निर्णय असतो. संपादक मंडळाचे सभासद हे विविध विषयातील तज्ज्ञ असून एखादा लेख स्वीकृत न झाल्यास, लेखकाला त्याची कारणे देण्यास ते बांधील नाहीत हे कृपया लक्षांत घ्यावे.

पत्रिकेकडे पाठवायचे लेख हे मराठी विज्ञान परिषदेच्या मुबईतील चुनाभट्टी येथील कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा परिषदेच्या office@mavipamumbai.org या इ-पत्त्यावर पाठवावेत.

4

Re: पत्रिकेतील लिखाणासंबंधी

धन्यवाद सर.