1

Topic: झाडावरचा आंबा खाली का पडतो ?

या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमची तर्कशक्ती वापरून द्या. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे किंवा तुम्हाला तुमच्या बुद्धीची शपत आहे न्युटन काकाचे किंवा अल्बर्ट काकाचे उत्तर देऊ नका . प्रयोग करायला वेळ नाही!!! १०० वर्षे जातील उत्तर शोधायला !!! हे तुमचे उत्तर अपेक्षित आहेत .
पण तर्क लावायला किती वेळ लागतो. तुम्ही जर विज्ञान प्रेमी असाल तर नक्कीच एक उत्तर तयार असेन. तुमचा तर्क जगाच्या पुढच्या भाविषाची कहाणी असू शकते, वरील प्रश्न आजही तेवढाच महत्वाचा आहे. अनंत कोटी घटना , गोष्टी आपण सहजपणे मान्य करतो पण सहज गंमत म्हणून तरी स्वतः त्यात किती तथ्य आहे हे पाहायला पहिजे. किंवा कमीतकमी विचार तरी करायला पाहिजे . !!!

हि विज्ञान चर्चा आहे कृपया लक्षात ठेवणे !!!

2

Re: झाडावरचा आंबा खाली का पडतो ?

हरिदास, मला प्रश्नाचा रोख समजला नाही. जर 'ही विज्ञान चर्चा आहे' याची आठवण करून देण्यात आलेली आहे; तर अश्या प्रश्नात 'न्यूटन काका', 'अल्बर्ट काका' किंवा ' तुमच्या बुद्धीची शप्पथ' अशी भाषा का वापरली आहे?  एका उलगडलेल्या कोड्याची आणि 'नियम' अश्या शब्दात बसवलेल्या उत्तराची 'त्यात किती तथ्य आहे…' अशी उलट तपासणी करायला हरकत नाही; पण ती तशी रोज वापरल्या जाणाऱ्या साध्या साध्या तंत्रज्ञानाने होतच असते की…

Last edited by santoshsaraf (19-03-2014 <> 21:57:39 PM)

3

Re: झाडावरचा आंबा खाली का पडतो ?

प्रिय संतोष सर ,
तुमच मत अगदी बरोबर आहे. मी मान्य करतो कि जी भाषा मी वापरली आहे ती पटण्यासारखी नाही, फक्त माझ मत सोप्या आणी रोजच्या वापरत असणाऱ्या मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे .  मी गुरुत्वाकर्षणाचा विरोध सुद्धा करत नाही. फक्त हे सांगायचं होत कि जर आपण त्या दोघांच्या जागी असतो तर आपण कसा विचार केला असता. मी हे मानतो कि प्रत्येकाकडे सर्जनशीलता (creativity ) असते, प्रत्येकाला जग वेगळ्या नजरेने पहायचा अधिकार असतो. गुरुत्वाकर्षण हे न्यूटन ने शोध लावण्याच्या अगोदर पासून अस्तित्वात होत फक्त त्याने - आहे हे सगळ्या जगाला नियमांनी सिध्द करून दाखवलं .
हा जगाचा शेवट नाही, किंवा जे आहे ते त्रिकालबाधित सत्य देखील नहि. यानंतर पृथ्वी वरील माणूस ब्रम्हांड कवेत घेईन जर आपण शिक्षण आणि सर्जनशीलता ( creativity )या दोघांना समान न्याय दिला तरच.
काही चुकल असेल तर माफी असावी.

4

Re: झाडावरचा आंबा खाली का पडतो ?

कारण आंबा हवेपेक्षा जड आहे. म्हणून तो वातावरणात खाली जमिनीवर पडेल. तसेच तो जमिनीपेक्षा हलका आहे म्हणून जमिनीवर राहील. जमिनीखाली जाणार नाही.

किंवा हवेतून खाली पाण्यात (तळ्यात) पडला तर पाण्यावर तरंगेल. पाण्यात बुडणार नाही. याचे कारण वर दिले आहेच.

5

Re: झाडावरचा आंबा खाली का पडतो ?

आद्य पतनस्य असमवायी कारणं गुरुत्वं । तर्क संग्रहकार

6

Re: झाडावरचा आंबा खाली का पडतो ?

म्हणजे काय ?