Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

1

Topic: एक्स-रे फिल्मची विल्हेवाट...

श्री.र.शं.गोखले यांनी पत्रिकेला पाठवलेले हे पत्र. यावर विज्ञानपिठाच्या सभासदांनी मतप्रदर्शन करावे...

---------------------

एक्स-रे फिल्मची विल्हेवाट...

प्रत्येकाच्या घरी जुन्या एक्स-रे फिल्म पडलेल्या असतात. नवीन एक्स-रे काढल्यानंतर, जुन्या एक्स-रे फिल्म निरूपयोगी होतात. अशा साठून राहिलेल्या जुन्या एक्स-रे फिल्मचे काय करावे? त्यांचा काही उपयोग करता येईल का? ते जाळल्यामुळे प्रदुषणात भर पडणार नाही का? पूर्वी ग्रामोफोनच्या खराब झालेल्या तबकड्यांचा, एक छंद म्हणून निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी उपयोग केला करीत असत. तसा यांचा काही उपयोग होऊ शकतो का? या फिल्म बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जातात? त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन त्यांतील महाग व दुर्मीळ द्रव्य अलग करता येईल का? अशा विविध अंगांनी विचार करून या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळायला हवे. कचरा जाळण्यातील ही एक वस्तू कमी करून त्यांतील द्रव्यांचा पुनर्वापर करणे शक्य आहे, असाही विचार करता येईल.

असा विचार करीत असताना ऑस्ट्रेलियातील रस्ते बांधणीचे काम कराणारे डॉ.शरद जोशी यांनी ई.टी.व्ही.वर दिलेल्या मुलाखतीची मला आठवण झाली. या मुलाखतीत त्या देशांत डांबरी रस्ते तयार करताना जुने टायर व कचकड्याचे बारीक तुकडे वापरले जातात असे त्यांनी सांगितले होते. डांबर गरम होत असताना एक्स-रे फिल्मपण वितळणार असतील व त्यांच्यात चिकटपणा असेल तर या फिल्मही रस्तेबांधणीत उपयोगी पडू शकतील.

या विचारमंथनातून एक्स-रे फिल्मचा चांगला उपयोग होऊ शकतो असे निष्पन्न झाल्यास, कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या नगरपालिका व ग्रामपंचायतींपर्यंत हा विचार पोचवावा लागेल.

---------------------

2

Re: एक्स-रे फिल्मची विल्हेवाट...

One can extract silver from these films.
The plastic film can recycled as  in case of other plastic film.

Now the problem of x-ray films may not  be
there as the x-ray photograph is now digital.

3

Re: एक्स-रे फिल्मची विल्हेवाट...

एक्स-रे फिल्म मध्ये चांगल्या प्रमाणात चांदी चा वापर केलेला असतो. विविध प्रकारच्या फिल्म वर रासायनिक प्रक्रिया करून चांदी वेगळी केली जाते आणि उर्वरित प्लास्टिक च्या फिल्म रिसायकल करून  त्या पासून अन्य हलक्या दर्जाच्या वस्तू बनवल्या जातात.

Last edited by Sujit_kochrekar (05-09-2014 <> 23:51:32 PM)