1

Topic: प्लास्टिक चा वापर

प्लास्टिक चा वापर आणि उत्पादन संदर्भात आपल्याकडे कितीही कडक नियम बनवले तरी प्लास्टिक च्या बहु उपयोगी गुणधर्मा मुळे त्याचा वापर आणि उत्पादन कमी होणे आपल्याकडे खूपच कठीण आहे
साधारण २ वर्ष पासून प्लास्टिक चे संभाव्य धोके अनेकदा वाचनात आल्याने आम्ही घरातील  वापरून खराब झालेल्या  प्रत्येक प्लास्टिक ची वस्तू पिशवी इ . गोष्टी वेगळ्या साठवून (घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प आमच्या शहरात तरी दुरावस्थेतच आहे त्यामुळे हा प्लास्टिक कचरा टाकण्याची योग्य सोय नसल्याने ) रद्दी वाल्याकडे पुनर्वापरासाठी देतो  आणि प्लास्टिक ची समस्या कमी करण्यात  खारीचा वाटा  उचलण्यात समाधान मनात आहोत
परंतु म . वि . प .च्या कुतूहल सदरात खालील माहिती वाचल्याने थोडी शंका निर्माण झाली

१. फार चांगली सोय नसल्याने ही पुनर्चक्रित प्लास्टिक गुणवत्तेत कमी पडतात.

२. उष्मामृदू प्रकारचे प्लास्टिक वारंवार वापरता येते. जुन्या वस्तूंचा भुगा करून तो नवीन पावडरीमध्ये जास्तीत जास्त ५ टक्के वापरला तर चालतो, पण काही लोक ६० ते ७० टक्के जुना माल वापरतात. तर काही १०० टक्के जुना माल वापरतात.
प्लास्टिकच्या वस्तू विकत घेताना त्या जुन्या प्लास्टिकपासून बनवलेल्या नाहीत ना? हे ओळखता यायला हवे. पण ते कसे ओळखणार? प्लास्टिक उद्योगात खूप स्पर्धा वाढत असल्याने कच्चा माल मिळणे मुश्कील होते. अशा वेळी बरेच लोक प्लास्टिकच्या जुन्या वस्तू गोळा करून त्याची पावडर बनवतात व ती नवीन मालाबरोबर मिसळून वस्तू बनवतात.
३. घराघरांतून गोळा केलेल्या जुन्या वस्तूंपासून बनवलेला माल फुटपाथवर विकला जातो. म्हणून वस्तू विकत घेताना त्या फुटपाथवरून विकत घेऊ नयेत. दुकानातून ब्रॅण्डेड माल विकत घ्यावा.

विशेषतः शेवटच्या वाक्यात  मला अशी  पुष्टी जोडावीशी वाटते कि फुटपाथ वरून प्लास्टिक काय कोणतीच वस्तू खरेदी करू नये कारण आपल्याकडे आता "फुटपाथ  हा स्वस्त माल खरेदी विक्री पट्टा या अर्थाने महापालिके तर्फे बांधण्यात येतो " अशीच व्याख्या रूढ झालेली दिसते . असो गमतीचा भाग सोडल्यास
येथे सांगितलेली गोष्ट मानली तर मागणी नाही म्हटल्या वर उत्पादक त्या  recycle प्लास्टिक चा काय उपयोग करणार? आणि  recycle साठी पाठवता येत नसेल तर रद्दी वाले प्लास्टिक ची रद्दी घेणारच नाहीत .

मग प्लास्टिक रद्दीचे पैसे मिळत नाही  तर नाही निदान पर्यावरणाची काळजी घेतल्याचे समाधान  देखील आमच्या सारख्यांना मिळणार नाही का ? अशी शंका मनात येते .

जुने प्लास्टिक ५ % च वापरले गेले आणि भरपूर  मागणी  असल्याने नवनवीन चांगले प्लास्टिक तयार होत राहणार आणि  पुन्हा प्लास्टिक कचरा पर्यावरणात तसाच राहिल्याने निर्माण होणारे संभाव्य धोके देखील तुम्ही कुतूहल च्या पुढील भागात सांगितल्या प्रमाणे निर्माण होताच राहणार आहेत मग या प्लास्टिक कचऱ्याचे करायचे काय ? म. वि प . ने  सर्वसामान्य जनतेला सहज करता येईल असे काही उपाय सुचवून (समस्या / धोके सांगण्या बरोबरच) जनजागृती केली पाहिजे असे वाटते .