1

Topic: ऊन्हाद्वारे पाण्याचे निर्जंतुकीकरण

पाण्यच्या पारदर्शक बाट्लीत पाणी भरून उन्हात ठेवली तर पाणी निर्ज्ंतुक होते

असा अनुभव आहे.

2

Re: ऊन्हाद्वारे पाण्याचे निर्जंतुकीकरण

आपण ज्याला 'अनुभव' म्हणता तो प्रयोग कसा केला गेला ते स्पष्ट करावे. कारण आपला अनुभव वाचल्यावर मनात अनेक शंका येतात. उदाहरणार्थ, उन्हात पाणी ठेवण्याच्या अगोदर त्यात कोणत्या प्रकारचे जंतू होते, त्यांचे प्रमाण किती होते, पाण्याची बाटली कोणत्या पदार्थापासून तयार केली गेली होती, किती वेळ ही बाटली उन्हात ठेवण्यात आली, या उन्हात कोणकोणत्या लहरलांबीचे प्रकाशकिरण होते, या विविध लहरलांबींच्या प्रकाशकिरणांचे प्रत्यक्ष प्रमाण किती होते, बाटलीला ऊन दिल्यानंतर जंतुच्या प्रमाणात काय बदल झाला, पाण्यातील जंतूंचे विश्लेषण करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या गेल्या, प्रयोगासाठी वापरलेल्या पाण्यात इतर कोणती रासायनिक द्रव्ये होती का, इत्यादी.

अतिनील किरण जरी अनेक प्रकारच्या जीवांणूंना (सर्वच नव्हे) नष्ट करू शकत असले तरी, पाणी निर्जंतूक करण्यासाठी त्याची किती मात्रा दिली जावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाद्वारे मिळालेल्या अतिनील किरणांचे प्रमाण त्यासाठी पुरेसे आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. ही मात्रा अर्थातच त्या पाण्यातील जंतूंच्या प्रमाणावर अवलंबून असणार हे उघडच आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुंची अशा परिस्थितीत तग धरून राहाण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते.

या बरोबरच पाण्याची बाटली कोणत्या पदार्थापासून बनलेली होती, हे ही मह्त्त्वाचे आहे. कारण पाण्याची बाटली ज्या पदार्थापासून बनलेली आहे, तो पदार्थच जर हे अतिनील किरण शोषून घेत असला, तर पाण्यापर्यंत हे अतिनील किरण पोचणार नाहीत. आणि तरीही जर पाणी निर्जंतूक होत असले तर पाण्यात अगोदरपासून अस्तित्वात असलेली रासायनिक द्रव्ये या जंतूना नष्ट करीत असावी असे म्हणण्यास जागा राहाते. अशा परिस्थितीत निर्जंतुकीकरण घडवून आणण्यात ऊन्हाचा सहभाग नसतो हे लक्षांत घ्यावे.

या सर्व शंकांचे आपण निरसन करावे ही विनंती.

Last edited by शंकासूर (17-12-2013 <> 12:56:30 PM)

3

Re: ऊन्हाद्वारे पाण्याचे निर्जंतुकीकरण

The queries raised by शंकासूर are very valid.

Statement made by Shri Limaye appears to be a casual one. Such science-related statement should be made very carefully. Otherwise it may lead to misunderstanding.

Last edited by anonymous (16-12-2013 <> 22:09:01 PM)