1

Topic: पत्रिका सक्षम करा...

पत्रिकेची पृष्ठसंख्या वाढवण्यासाठी तसेच पत्रिका अधिक आकर्षक करण्यासाठी, पत्रिका अधिक सक्षम होण्याची गरज आहे. यासाठी आपण हे करू शकता...

(१)    आपण परिषदेचे आश्रयदाते सभासद होऊ शकता. (आश्रयदात्या सभासदांना वीस वर्षांसाठी पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल.)
(२)    आपण पत्रिकेचे वार्षिक वर्गणीदार होऊ शकता.
(३)    पत्रिकेसाठी आपण देणगी देऊ शकता.
(४)    पत्रिकेत आपण जाहिराती देऊ शकता.
(५)    आपण ज्या शाळेत शिकलात त्या शाळेची पत्रिकेची वर्गणी भरून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता.
(६)    वाढदिवस व इतर विशेष कारणांनिमित्त आपण आपल्या आप्तांना वा सुहृदांना, त्यांच्या नावे वर्गणी भरून, पत्रिकेची भेट देऊ शकता.
(७)    आपण वैद्यकीय तज्ज्ञ असल्यास,आपण आपल्या दवाखान्यात / कन्सल्टिंग रूममध्ये / इस्पितळात येणाऱ्यांना वाचण्यासाठी पत्रिकेची प्रत ठेवू शकता.
(८)    आपण इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक असल्यास, आपल्याला भेटायला येणाऱ्या व्यक्तींना वाचण्यासाठी स्वागतक्षात पत्रिकेची प्रत ठेवू शकता.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

2

Re: पत्रिका सक्षम करा...

हि खूप महत्वाची चळवळ आहे.मराठी मधे पूर्ण पाने विज्ञानासाठीची एकमेव पत्रिका असेल.

3

Re: पत्रिका सक्षम करा...

म . वि . प . चे  पत्रिका हे मासिक खूपच माहिती पूर्ण असते मी गेले २-३ वर्ष त्याची वर्गणी भारत आहे परंतु प्रत्येक वेळेस पैसे विभाग प्रमुखांकडे नेउन द्यायला वेळ मिळत नाही किंवा ऑफिस च्या वेळे मुळे बँकेत cash भरण्याच्या रांगेत वेळ देणे नेहमीच जमत नाही ; आज बहुतेक जण ऑफिस च्या वेळा जमत नाहीत  म्हणून online debit  कार्ड वापरून बहुतेक Payments करतात Online Shopping आता बऱ्यापैकी  प्रचलित झाले आहे  शाळा संस्थांमध्ये देखील आजकाल इंटरनेट असते तेव्हा online form  आणि debit card ने online payment या सुविधेचा विचार नक्की व्हावा हि विनंती

4

Re: पत्रिका सक्षम करा...

आपण केलेली सूचना ही स्वीकारार्ह आहे. अशीच सूचना इतर काही वाचकांनीही केली आहे. परंतु काही अंतर्गत मर्यादांमुळे आज तरी ती सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य नाही. भविष्यात अशी सुविधा नक्कीच उपलब्ध करून दिली जाईल.

मात्र आपण आपल्या बँकेतून परिषदेच्या खात्यात पत्रिकेची वर्गणी नेट बँकींगद्वारे थेट जमा करू शकता. आपल्या तसे करायचे असल्यास आपण कार्यालयाच्या ई-पत्त्यावर ईमेल करून परिषदेच्या बँक खात्याचा तपशील मागवून घ्यावा व त्या खात्यात वर्गणीची रक्कम जमा करावी. अनेक वाचक आपली वार्षिक वर्गणी ही या पद्धतीद्वारे परिषदेत जमा करीत आहेत.

- प्रशासक