1

Topic: राजापूरची गंगा

राजापूरची गंगा अवतरणे व भूकंप यातील परस्पर संबंधावर कुणी वैज्ञानिक माहिती सांगू शकेल का ?

2

Re: राजापूरची गंगा

राजापूरची गंगा हे निनालाचे (siphon) उदाहरण असावे. राजापूरच्या आजुबाजूच्या डोंगराळ भागातील पाण्याची पातळी एका ठरावीक ऊंचीपर्यंत पोचली की निनालाचा परिणाम होऊन या पाण्याच्या विसर्जनाला राजापूर येथील त्या विशिष्ट ठिकाणाहून वाट मिळत असावी.

राजापूरची गंगा ही साधारणपणे दर तीन वर्षांनी अवतरते. जर भूकंपाचा आणि या गंगेचा प्रत्यक्ष संबंध असता तर राजापूरला दर तीन वर्षांच्या कालावधीनंतर भूकंपाचे धक्के बसायला हवेत. परंतु असे होत नाही. त्यामुळे राजापूरच्या गंगेचा आणि भूकंपाचा संबंध असण्याची शक्यता नाही.

3

Re: राजापूरची गंगा

राजापूरची गंगा ही साधारणपणे दर तीन वर्षांनी अवतरते पण जर कुठे भूकंप झालाच तर निच्छित लगेचच अवतरते. जर राजापूरची गंगा हे निनालाचे (siphon) उदाहरण असेल तर त्याचा संबंध वार्षिक पर्जन्यवृष्टीशी असायला हवा. तसे न होता राजापूरची गंगा साधारणपणे दर तीन वर्षांनी (ठराविक कालावधीनेच) अवतरते. असे का व्हावे ?

Last edited by जोजव लखमापूरकर (02-05-2012 <> 21:26:57 PM)

4

Re: राजापूरची गंगा

जोजव लखमापूरकर यांनी व्यक्त केलेले मत वाचले. परंतु वामन यांनी व्यक्त केलेले मत जास्त सयुक्तिक वाटते.  वामन यांनी 'डोंगराळ भागातील पाण्याची पातळी एका ठरावीक ऊंचीपर्यंत पोचली की....' हे जे विधान केले आहे ते पर्जन्यवृष्टीशी संबंधीत आहे हे उघडच आहे. पाण्याची पातळी वाढण्यासाठी पर्जन्यवृष्टीची गरज आहेच.

मात्र जोजव लखमापूरकर म्हणतात की जर कुठे भूकंप झालाच तर राजापूरची गंगा निश्चितपणे लगेचच अवतरते. लखमापूरकरांचे हे विधान अवैज्ञानिक वाटते. जर भूकंपामुळे राजापूरची गंगा अवतरत असेल तर त्या गंगेचे स्वरूप हे नक्कीच, भूकंप कोठे व कोणत्या क्षमतेचा झाला, यावर अवलंबून असेल. (जेव्हा इंडोनेशियात भूकंप होतो तेव्हा राजापूरची गंगा वाहू लागते का?) तसेच अतिशय क्षीण स्वरूपाचे भूकंपाचे धक्के अनेक वेळा अनेक ठिकाणी बसत असतात. जर क्षीण स्वरूपाच्या भूकंपामुळे राजापूरची गंगा निर्माण होत असली तर राजापूरची गंगा वारंवार वाहायला हवी. याउलट जर राजापूरच्या गंगेच्या निर्मितीला मोठ्या तीव्रतेचा भूकंप गरजेचा असला तर असा भूकंप अलिकडच्या काळात तरी राजापूरच्या परिसरात झालेला नाही. तरीही दर तीन वर्षांनी राजापूरची गंगा वाहते आहे.

पुरेशा तीव्रतेच्या भूकंपामुळे एखाद्या वेळी पाण्याचा नवा झरा सुरू होऊ शकेलही. परंतु भूकंप ठरावीक काळाने घडून येत नसतात. एखादा परिसर भूकंपप्रवण असला तर त्या भागात भूकंपाचे धक्के अधिक प्रमाणात बसतात. परंतु त्यात निश्चित स्वरूपाची वारंवारिता नसते. राजापूरची गंगा ही भूकंपामुळे निर्माण होत असती तर राजापूरला ठरावीक काळाने (दर तीन वर्षांनी) भूकंपाचे धक्के बसायला हवेत हे वामन यांनी म्हटलेच आहे.

Last edited by शंकासूर (06-05-2012 <> 22:24:00 PM)

5

Re: राजापूरची गंगा

In my schooldays, I had seen 'Acme Cup of Tantlus'. You can go on filling it with water upto a certain level. When water reaches this particular level, it gets fully drained out of the cup.

Is the above effect similar to what happens with 'Acme Cup of Tantlus'. If it is so, then it is a natural 'Acme Cup of Tantlus'!

Quite interesting....
.

6

Re: राजापूरची गंगा

उत्तम उदाहरण...!

7

Re: राजापूरची गंगा

याला मराठीत वासुदेव पात्र म्हणतात.  हे  निनालाचे (siphon) तत्वावर काम करते. भूकंपाचा संबंध नसला तरी राजापूरची गंगा अवतरण्याचे समाधानकारक, विज्ञानाधारीत उत्तर काही अद्याप सापडत नाही.

8

Re: राजापूरची गंगा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7530772.cms

या लिंकवर माहिती मिळते पण ती पुरेशी वाटत नाही.

9

Re: राजापूरची गंगा

संध्या राजापूरची गंगा ही जुलै 2013 (जेव्हा उत्तर भारतात अतिवृष्टी झाली तेव्हा) अवतारली.हेच्या अगोदर 3 महीन्यापूर्वी आली,त्याहीपूर्वी 11 महीन्यांनी आली. म्हणजे दर 3 वर्षानी येतेच असे नाही.