1

Topic: चंद्रग्रहण

या महिन्याच्या २१ तारखेला चंद्रग्रहण असल्याचं वाचनात आलं. हे चंद्रग्रहण पाहाता येईल का? ते किती वाजता दिसू शकेल?

2

Re: चंद्रग्रहण

दिनांक २१ डिसेंबर २०१० रोजी होणारे चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दिवसा होणार असल्याने भारतातून दिसू शकणार नाही. ग्रहणाचा स्पर्श हा भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजून ३ मिनीटांनी होणार असून खग्रास स्थितीची सुरूवात १ वाजून ११ मिनीटांनी होणार आहे. खग्रास स्थितीचा शेवट २ वाजून २५ मिनीटांनी होईल. ग्रहणाचा मोक्ष हा दुपारी ३ वाजून ३३ मिनीटांनी होणार आहे.

3

Re: चंद्रग्रहण

तर मग, भारतातून दिसणारे चंद्रग्रहण यानंतर केव्हा होणार आहे?

4

Re: चंद्रग्रहण

यानंतरचे चंद्रग्रहण हे दिनांक दिनांक १५ जून २०११ रोजी होणार आहे. हे ग्रहण खग्रास असून भारतातून मध्यरात्री दिसू शकेल.

5

Re: चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल?

6

Re: चंद्रग्रहण

चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडलेली असते. कारण यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी आलेली असते. याच वेळी चंद्रावरील अंतराळवीराच्या दृष्टीने सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी आलेली असेल. त्यामुळे यावेळी चंद्रावरून पाहाणार्‌याला सूर्य हा पृथ्वीमुळे झाकलेला दिसेल. म्हणजे चांद्रवीराच्या दृष्टीने हे सूर्यग्रहण असेल.

चंद्रावरून पृथ्वीच्या बिंबाचा व्यास हा सूर्याच्या व्यासापेक्षा साडेतीनपट मोठा दिसतो. यामुळे चंद्रावरून दिसणार्‌या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती ही सुमारे तीन तासांची असेल. मात्र यावेळी पृथ्वीची काळी बाजू जरी आपल्याकडे असली तरी पृथ्वीभोवताली प्रकाशाचे वर्तुळ दिसत राहील. हे वर्तुळ पृथ्वीच्या वातावरणामुळे विखुरल्या गेलेल्या सूर्यकिरणांमुळे तयार झालेले असेल. या वर्तुळाचा व्यास आपल्याला पृथ्वीवरून दिसणार्‌या चंद्रबिंबाच्या किंवा सूर्यबिंबाच्या साडेतीनपट असेल.

7

Re: चंद्रग्रहण

It is really astonishing to know that duration of total solar eclipse (as seen from Moon) can be three and half hours long...