1

Topic: उजाड दगडाच्या खाणी मध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी साठवणे प्रकल्प

उजाड दगडाच्या खाणी मध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी साठवणे प्रकल्प

                                       

    १)        आपल्या कडे दगडाच्या खाणी बरयाच प्रमाणात उत्खनन करून रिकाम्या पडलेल्या आहेत.त्याचा आकार  " C " अथवा बहुतांश " O " त्य्पे असतो .त्यांच्या मोकळ्या समोरच्या बाजूला कॉंक्रिटची भिंत बांधली तर त्यांचे रुपांतर मोठ मोठ्या टाक्यांमध्ये होईल आणि आपण त्यात पाणी साठवू शकू.
२)       पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या धरणात पाणी आपण अडवतो काही काळाने सर्व धरणे भरून वाहू लागतात. तेव्हा धारण भरल्या नंतर वाहून जाणारे पाणी आपण सध्या उपलब्ध असलेल्याच पाण्याच्या वाहिनीमधून आणून त्यांच्या मार्फत वरील टाक्या भरू शकू म्हणजे वागल्या पाईप लाईन ची गरज लागणार नाही तसेच नवीन मोटार पंप ची आवश्यकता नाही.थोड्याशा खर्चात पाणी टाकी पर्यंत पोहचू शकते आणि हे फक्त पावसाळ्यातच करायचे आहे.
३)       दुबार शेती साठी,भाजीपाला ,बागायती साठी हे पाणी आपण वापरू शकतो.तसेच हे पाणी जमिनीत पाझरवून जमिनीची पाण्याची पातळी वाढवू शकू.हे पाणी पूर्णपणे पावसाचे असल्याने कोणताही धोका नाही.जमीन ओली झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग जी वातावरणाच्या तापमानाची वाढ झाली आहे ती कमी होण्यास व हवेत गारवा वाढवण्यास मदत होईल आणि पाऊस वेळेवर पडेल.
४)      सदरच्या टाकी भोवती सुंदरसा बगीचा त्याच पाण्यात करून हे पिकनिक स्पौट म्हणून  उपयोगी येऊ शकतात.त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतील आणि उजाड जमिनीतून रोजगार निर्माण होईल.
                अशा प्रकारे एका भग्न उजाड जागेचे रुपांतर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करून घेऊन समाजातल्या जास्तीत जास्ती लोकांना त्याचा फायदा पोहचवता येईल.
          हा प्रकल्प कमीत कमी खर्चाचा आहे.तसेच जागा ओसाड कोणत्याही कामाची नसल्याने लवकर हस्तांतरण करून होईल.तसेच हा प्रकल्प आत्याव्षक बाब असल्याने जमीन हस्तांतरणाला कोणताही आक्षेप येऊ शकत नाही.

प्रशांत गुप्ते
ठाणे
९३२४०३७८२८


Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

Deprecated: preg_replace(): The /e modifier is deprecated, use preg_replace_callback instead in /home/mavipamu/forum.mavipamumbai.org/include/parser.php on line 738

2

Re: उजाड दगडाच्या खाणी मध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी साठवणे प्रकल्प

अशा प्रकारचे प्रयत्न काही ठिकाणी केले जात आहेत. या संबंधीची एक बातमी पूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्यातील एक परिच्छेद असा....

पवईतील हिरानंदानी गार्डन्स परिसराच्या मागे अंदाजे ३२ एकरांचा डोंगराळ भाग शर्मा यांच्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा असून त्यातील टेकड्या 'नो डेव्हलपमेंट झोन'मध्ये येतात. या टेकड्यांवरच अंदाजे २०००पर्यंत शर्मा यांच्या दगडाच्या खाणी होत्या. त्यानंतर हा भाग पडीक जमीन असला तरी, खाणकामामुळे तिथे दोन प्रचंड खड्डे (अंदाजे ७० फूट खोल आणि क्षेत्रफळ अंदाजे दोन एकर) तयार झाले होते. या खड्ड्यांचा तळ दगडांचा असल्याने तिथे पाणी साठवणे सहज शक्य आहे. या जमिनीच्या विकासाचे काम प्लॅन्सपॅट्सेनर या जर्मन आकिर्टेक्चर कंपनीकडे सोपविले. अंदाजे सात लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे आयटी पार्क आणि कर्मचारी निवासस्थाने उभी राहतील असे डिझाइन या कंपनीने तयार केले आहे.

या माहितीची जोडणी खालील प्रमाणे आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/ … page-1.cms

Last edited by anonymous (26-05-2012 <> 07:23:11 AM)

3

Re: उजाड दगडाच्या खाणी मध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी साठवणे प्रकल्प

But the care should be taken that this water won't lose by evaporation.