1

Topic: big bang theory

If the universe is expanding, and galaxies are moving farther apart, then why is it that the Milky way and Andromeda galaxies are on a collision course?"

2

Re: big bang theory

if u really dont know the centre of the universe ,how u can say that it is expanding

3

Re: big bang theory

(१) एखादी वस्तू प्रसरण पावण्यासाठी तिला केंद्र असण्याची गरज नाही. हे लक्षात येण्यासाठी एक छोटासा प्रयोग करता येईल. एक फुगा घ्यायचा आणि तो थोडासा फुगवायचा. या फुग्याच्या पृष्ठभागावर शाईने दोन ठिपके काढायचे आणि त्या दोन ठिपक्यांतले अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर दोरा ठेवून मोजायचे. आता हा फुगा आणखीन फुगवायचा आणि दोन्ही ठिपक्यांतलं अंतर मोजायचं. दोन्ही ठिपक्यांतील अंतर वाढलेलं दिसेल. म्हणजे फुग्याच्या पृष्ठभागाला निश्चित असं केंद्र नसूनही फुगा फुगलेला आहे हे समजू शकतं. विश्वाच्या प्रसरणाच्या बाबतीतही अशीच स्थिती असते.

(२) विश्वातील विविध दीर्घिकांचं एकमेकांपासून दूर जाणं हे फक्त वैश्विक स्तरावर जाणवतं. स्थानिक स्तरावर नव्हे. देवयानी दीर्घिका ही आपल्यापासून फक्त २२ लक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ही दीर्घिका, दीर्घिकांच्या एका मोठ्या समूहाची सभासद आहे. या समूहातील काही दीर्घिका या एकमेकांपासून जवळ जात आहेत तर काही दूर जात आहेत. मात्र अशा विविध समूहांचीच एकमेकांच्या गतिशी तुलना केली तर मात्र हे समूह एकमेकांपासून दूर जात असल्याचं लक्षांत येईल.

Last edited by rajeev (13-12-2013 <> 13:46:20 PM)

4

Re: big bang theory

(१) एखादी वस्तू प्रसरण पावण्यासाठी तिला केंद्र असण्याची गरज नाही. ....................विश्वाच्या प्रसरणाच्या बाबतीतही अशीच स्थिती असते.
..........................................................................................................................................

गोलाच्या पृष्ठभागाला ठराविक केंद्रबिंदू नाही मात्र संपूर्ण गोलास केंद्र बिंदू आहे. गोलाच्या केंद्र बिंदू पासून होणारे प्रसरण म्हणू शकतो का?

फुग्यावरच्या ठीपक्याच्या प्रसारणाप्रमाणे एका एका दिर्घिकेचे देखिल प्रसारण होते का?

Last edited by Uday Nagaonkar (23-06-2014 <> 23:48:58 PM)

5

Re: big bang theory

गोलाच्या पृष्ठभागाला देखील केंद्रबिंदू असतो. फुग्याचे उदाहरण केवळ समजावण्यासाठी आहे. त्याप्रमाणे तंतोतंत स्थिती नाही. कारण फुग्याचा पृष्ठभाग आपण द्विमिती मध्ये लक्षात घेतो; पण विश्व मात्र त्रिमितीमध्ये विस्तारत आहे.
फुग्याच्या ठिपक्यांप्रमाणे आकाशगंगा विस्तारत नाहीत.

6

Re: big bang theory

@ संतोष: गोलाच्या पृष्ठभागावर सापेक्ष केंद्र बिंदू असतो अस मानल जात.
त्रिमित विश्वाचे प्रसरण त्रिमितच होत आहे.
भौतिकशास्त्रज्ञ आणि गणिती अलेक्झांडर फ्रीडमन यांनी जी विश्व प्रसरणाची
प्रतिकृती मांडली. त्यासाठी त्यांनी २ गृहीतक ठरवली.
१. आपण कोणत्याही दिशेने पाहील तरी विश्व सारख दिसत.
२. आपण विश्वाकडे इतर कोणत्याही ठिकाणाहून पाहील तरी वरील गोष्ट खरीच असेल.

मला हे निरीक्षकाच स्थान नीट समजलेलं नाही.
निरीक्षक गोलाच्या मध्यभागाच्या आसपास आहे का?
जर गोलात गोल, गोलात गोल अशी आकृती प्रसरणासाठी मांडली तर मध्यभाग
आणि सर्वात बाहेरचा भाग येथे प्रसरण वेग वेगवेगळा आहे का?

7

Re: big bang theory

निरीक्षक गोलाच्या मध्यभागाच्या आसपास आहे का?>>> कोणताही गोल या संदर्भात अद्याप कोणी कल्पिलेला नाही. त्यामुळे निरीक्षक कोणत्या गोलाच्या मध्यभागी आहे किंवा कसे याबाबत चर्चा होऊ शकत नाही.
जर गोलात गोल, गोलात गोल अशी आकृती प्रसरणासाठी मांडली तर मध्यभाग
आणि सर्वात बाहेरचा भाग येथे प्रसरण वेग वेगवेगळा आहे का?>>> अशी कोणतीही प्रतिकृती कोणीही मांडलेली नाही. किंबहुना विश्व गोलाकार आहे की सपाट की अजून कोणत्या अन्य आकाराचे या बाबत मानव अनभिद्न्य आहे.