1

Topic: जांभळा प्रकाश

दृश्य प्रकाश सात रंगांचा मिळून बनलेला असतो. त्यापैकी जांभळा रंग सर्वात कमी तरंग लाम्बिचा असतो असे आम्हाला शाळेत  शिकवले होते. त्यानुसार जांभळ्या रंगाचा वेग सर्वात कमी असला पाहिजे. मग, एखादी अवकाशस्थ वस्तु कोण्या कारणाने झाकली गेली; तर त्याच्याकडून येणारा ताम्बडा प्रकाश आधी थांबेल आणि जांभळा  सर्वात शेवटी. असे प्रत्यक्षात होते का?

2

Re: जांभळा प्रकाश

An interesting question!.... Nobody to answer?

3

Re: जांभळा प्रकाश

santoshsaraf यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे.

मात्र निर्वात पोकळीमध्ये सर्व तरंगलांबीचे प्रकाशकिरण सारख्याच वेगाने प्रवास करीत असतात. त्यामुळे दूरच्या अवकाशस्थ वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशकिरणांच्या वेगात तरंगलांबीनुसार पडणारा हा फरक, त्या प्रकाशकिरणांचा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश झाल्यानंतरच घडून येतो. वातावरणात शिरल्यावर प्रकाशकिरणांचा वेग हा त्या त्या लहरलांबीनुसार वेगवेगळा असला तरी मुळातच प्रकाशाच्या वेगात पडणारा हा फरक अवघा ०.०३ टक्क्यांच्या आसपास (म्हणजे सेकंदाला फक्त ९० किलोमीटरच्या आसपास) असतो. त्यामुळे हे सर्व प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांकडून वेगवेगळे टिपले न जाता जवळ जवळ एकाच वेळी टिपले जातात.

एक गोष्ट मात्र खरी की या प्रकाशलहरींच्या वेगातील अल्प फरक हा प्रकाशकिरणांच्या तरंगलांबीनुसारच्या दिशाबदलाला कारणीभूत ठरतो. प्रकाशकिरणांच्या या अपवर्तनामुळे (refraction) प्रकाशाचे विविध तरंगलांबींत अपस्पकरण (dispersion) घडून येऊन तारे हे आपल्याला विविध रंगात लुकलुकताना दिसतात.