1

Topic: आतून लाल झालेली तोंडली

श्रीम. सुजाता पळसुले यांनी परिषदेला इ-मेलद्वारे एक प्रश्न विचारला होता. त्याचा सारांश असा आहे.

"मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला असं शिकवण्यात आलं होतं की तोंडली ही आतून लाल झाली असल्यास खाऊ नये. परंतु आता मला असं सांगण्यात आलं आहे की अशी तोंडली खाण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा वस्तुस्थिती काय आहे?"

हा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता असल्याने तो या विज्ञानपीठावर उपस्थित करीत आहोत.

2

Re: आतून लाल झालेली तोंडली

परिषदेचे श्री.दिलीप हेर्लेकर यांनी या प्रश्नावर पुढील उत्तर दिले आहे.

"आपल्या जेवणातील बहुतेक भाज्या या साधारणपणे त्या कोवळ्या असतानाच स्वैपाकासाठी वापरल्या जातात. जेव्हा या भाज्यांचा रंग पिवळा किंवा लाल होतो तेव्हा त्या नीटपणे शिजवणंही कठीण होतं तसंच त्या पचनालाही जड होतात. या कारणामुळे अशा पिवळ्या वा लाल झालेल्या भाज्यांचा वापर टाळला जात असल्याची शक्यता आहे. (अपवाद फक्त लाल भोपळ्यासारख्या काही भाज्यांचा.)"

विज्ञानपीठाच्या सभासदांनीही यावर आपली मते व्यक्त करावीत ही अपेक्षा...