1

Topic: अधिवेशन

मा. व्यवस्थापक
मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे  सर्व video  संकेतस्थळावर उपलब्ध करावेत हि विनंती.  इच्छा असूनही प्रत्येकाला अधिवेशनाला जाता येते असे नाही.
धन्यवाद
प्रविण पाटील

2

Re: अधिवेशन

मी मविप चा सभासद नाहि पंण प्रविण141 यांची सुचना योग्य वाटते. युट्युबचा चांगला ऊपयोग इथे होऊ शकतो.

3

Re: अधिवेशन

धन्यवाद...!

आपण केलेल्या सूचना चांगल्या आहेत. परंतु यात एक अडचण आहे. अधिवेशन हे परिषदेच्याच एखाद्या विभागाच्या पुढाकाराने घेतले जाते. त्यामुळे या चित्रिकरणाचा निर्णय हा तो तो विभाग आपल्या आर्थिक परिस्थतीचा विचार करून घेतो. परंतु विभागांनी जर आपल्याकडे झालेल्या अधिवेशनाचे संपूर्ण चित्रिकरण केले व त्याच्या चित्रफिती संपादित स्वरूपात उपलब्ध करून दिल्या, तर त्या चित्रफिती यूट्यूबद्वारे परिषदेच्या संकेतस्थळावर नक्कीच दाखवता येतील. पुढील अधिवेशनांच्या वेळी हा विचार करता येईल.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

4

Re: अधिवेशन

०४ /०१/२०१३ रोजी मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे सर्व video संकेतस्थळावर उपलब्ध करावीत अशी विनंती विज्ञान पीठ मधून केली होती. माझ्या (आमच्या) विनंतीचा विचार करून आपण चित्रफिती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप ....आभार.

धंन्यवाद
pravin141 (Pravin Patil)
नागझरी (अलिबाग)
(विज्ञानपीठ सभासद)

5

Re: अधिवेशन

प्रिय प्रविण,

खरं तर, आपण परिषदेच्या लोणावळा विभागाचे आभार मानायला हवेत. त्यांनी संमेलनाचे संपूर्ण चित्रमुद्रण करून घेतल्यामुळेच हे शक्य झाले.

- प्रशासक (विज्ञानपीठ)