1

Topic: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

वनस्पती दिवसा प्रकाश संश्लेषण करून प्राणवायू बाहेर सोडतात. यासाठी पर्णछिद्रे उघडी असतात. रात्रीही वनस्पतीमध्ये श्वसन चालू असते. त्या प्राणवायू घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतात. म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये.
पण मग रात्री श्वसनासाठी पर्ण छिद्रे उघडी असतात काय? नसतील तर त्या प्राणवायू घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर कसा सोडतात?

2

Re: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

वनस्पति सूर्यप्रकाशामध्ये प्रकाशसंश्लेषण क्रियेमधून ऑक्सिजन सोडतात. हा ऑक्सिजन त्याना कर्बोदकांच्या चयापचयासाठी उपयोगी पडतो. प्रकाशसंश्लेषण क्रियेमधून अतिरिक्त ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्री वनस्पतिना लागणारी  ऑक्सिजनची गरज दिवसाएवढीच असते. पण रात्री ऑक्सिजन ऐवजी कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. सर्व सजीव ऑक्सिजन चयापचयासाठी वापरतात आणि कार्बना डाय ऑक्साइड सोडतात. रात्री झाडांच्या तळाशी कार्बन डायऑक्साइड साचतो. कार्बन डाय ऑक्साइड हवेपेक्षा जड आहे. तो जमिनीलगत साचतो. म्हणून रात्री झाडाखाली झोपणे टाळावे. पानाच्या खालील बाजूस असलेली पर्णछिद्रे वनस्पतिमधून बाहेर येणारे बाष्प नियंत्रित करतात.

3

Re: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

sudhakar यांचा चांगला प्रश्न व Madwanna यांनी त्याला दिलेले माहितीपूर्ण उत्तर याबद्द्ल दोघांना धन्यवाद. फक्त काही शंका...

(१) झाडांकडून दिवसा सोडला जाणारा प्राणवायू व त्याच बरोबर सोडला जाणारा कार्बन डायऑक्साईड यांचे एकमेकांच्या तुलनेत (सर्वसाधारणपणे) प्रमाण किती असते?

(२) रात्री झाडे फक्त कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे रात्री झाडाखाली झोपणे टाळावे असे आपण म्हटले आहे. (शालेय पुस्तकांतही हा उल्लेख असायचा.) या विधानातून जंगलात वा दाट झाडी असलेल्या भागात राहाणे (जिथे आपल्या डोक्यावरही झाडांचे छत्र असते) हे धोक्याचे असल्याचा संदेश मिळतो. तेव्हा झाडाखाली झोपणे खरोखरच धोकादायक आहे का? (किंबहूना वन्य जमाती या हजारो वर्षे जंगलांच्या आश्रयानेच जगत आल्या आहेत.)

(३) माणसाला जर हा धोका असला तर तो इतर प्राण्यांच्या बाबतीतही असला पाहिजे. कारण आपल्या आजुबाजूचे सर्वच प्राणी-पक्षी प्राणवायुच्या श्वसनावर जगत आहेत. तेव्हा असा धोका झाडांच्या सान्निध्यात राहाणाऱ्या इतर प्राण्यांनाही संभवतो का?

-----------

4

Re: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

nice questions there..1]i am sorry i don't know the exact proportion so i can't answer your 1st question...2]shakyato punyala jayla payi jane talave ase apan mhanto similarly shakyato zadankhali zopane talave..that doesnt mean u will die for sure...1st point....attachya industrial jagat buildings ani itar surroundings lakshat gheta janglat asnarya vahatya haveche praman kami aste...janglat kheltya haveche praman jast aslya karnane khali sachlela co2 jast dhokadayak nasto(dhokadayak asto pan kami pramanat)..2nd point...adivasi ani apan hyat jo farak karaycha mhantla tar aplya hya 2nd prashnavarun karta yeil ki tyanna hya goshtichi janiv navti ki te hya fact madhun suffer kartahet....3]prani ani pakshi hyan babat bolayche zale tar pakshya babat ithe ha prashna thoda mala illogical vatte ani pakshyanchya babtit oxygen chi kamtarta bhasavi ase mala vatat nahi...yes ofcourse if we talk about the animals nisargache kahi tari counter measures sudhha astil for certain life style but if we consider only animals then yes i am too curious to know the facts...once again we can apply similar fact just like the above 2nd point i mentioned but i am still not satisfied considering the case of animals

5

Re: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

1.    झाडे दिवसा ऑक्सिजन सोडतात. सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डाय ऑक्साइड आणि पाण्यापासून ग्लूकोज तयार होताना ऑक्सिजन उपपदार्थ तयार होतो. अर्थात किती वेळ सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, पानांचा पृष्ठभाग किती क्षेत्रफळाचा आहे यावर किती ऑक्सिजन तयार होणार हे अवलंबून आहे. चोवीस तासात एक मध्यम आकाराचा वृक्ष जेवढा ऑक्सिजन सोडतो त्याहून कमी ऑक्सिजनचा वापर करतो. एक ग्लूकोज रेणू तयार होण्यासाठी कार्बनडायॉक्साइडचे सहा रेणू लागतात. यावेळी  सहा ऑक्सिजन रेणूं तयार होतात होते. ग्लूकोजच्या रेणूमध्ये सहा कार्बनचे अणू आहेत (C6H12O6). एक कार्बन अणू झाडाने वापरला म्हणजे एक ऑक्सिजन मिळतो. उदाहरणादाखल बारा  मीटर उंची असलेल्या झाडाचे वजन मुळे, खोड आणि पानासहित  दोन टन असते. दर वर्षी पाच टक्के त्याचे वजन वाढते असे गृहित धरले आहे. शंभर किलो त्याच्या काष्ठ वजनामध्ये झालेल्या वाढीमध्ये 38 किलो कार्बन. 38 किलो कार्बन गुंतला तर 100 किलो ऑक्सिजन एक झाड दरवर्षी मुक्त करते.
    उत्तर 2 आणि 3
ज्या ठिकाणी जंगलामध्ये मनुष्य वस्ती असते तेथे घर झाडाखाली नसेल अशी जागा शोधली जाते. वसतीभोवती झाडे भरपूर असल्यास झाडे तोडून मोकळी जागा झोपड्या घरे बांधण्यासाठी तयार केली जाते. या बद्दल सत्यवान सावित्रीची ग़ोष्ट विज्ञानाच्या बाजूने आणखी एकदा वाचल्यास याची उजळणी होईल. भर दुपारी सत्यवान सावित्रीबरोबर अरण्यात लाकूड तोडण्यासाठी गेला. गर्द झाडीमध्ये काम करीत असता ऑक्सिजनची गरज चयापचयाचा वेग वाढल्याने अधिक होते. झाडाच्या तळाशी जड कार्बन डायऑक्साइड साठून रहात असल्याने तो अस्वस्थ झाला. तो गुदमरू लागला. अशा वेळी सावित्रीने हे वेळीच ओळखून त्याला मोकळ्या जागेत सूर्यप्रकाशात आणले. पुढील यमाने त्याचे प्राण परत दिले हा भाग पौराणिक आहे. वैज्ञानिक सत्य सवित्रीने त्याचे प्राण वाचवले एवढाच आहे. शरीराचे तापमान अधिक असलेल्या पक्षी आणि सस्तन प्राण्यांची ऑक्सिजनची गरज अधिक आहे. त्यामुळे ज्याना अधिक ऑक्सिजन लागतो अशी माकडे आणि पक्षी झाडावर उंच ठिकाणी राहतात. गोरिला झाडावर पाने आणि काटक्यांचा बिछाना करतो. सरपटणा-या प्राण्याना कमी ऑक्सिजन पुरतो ते झाडाच्या तळाशी बिळामध्ये राहतात.
अधिक माहिती.
एका मनुष्यास एका वर्षामध्ये 9.5 टन हवेची श्वसनासाठी आवश्यकता आहे. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. एका शासोछ्वासातून आपण एक तृतियांश एवढाच ऑक्सिजन वापरतो. दोन तृतियांश ऑक्सिजन परत सोडतो. एका वर्षामध्ये 740 किलो ऑक्सिजन एक व्यक्ती वापरते. सात ते आठ सामान्य उंचीची झाडे एवढा ऑक्सिजन दरवर्षी सहज निर्माण करतात. झाडांच्यापेक्षा अधिक ऑक्सिजन महासागरातील प्लवंग निर्माण करतात. भूपृष्ठ फक्त तेहतीस टक्के एवढेच आहे. पण सहासष्ट टक्के सागराच्या पृष्ठ्भागावरून अधिक ऑक्सिजन निर्मिती आणि अधिक कार्बन डायऑक्साइड शोषला जातो. अर्थात यामुळे झाडांचे महत्व कमी होत नाही.

Last edited by Madwanna (28-12-2012 <> 15:33:40 PM)

6

Re: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

उपयुक्त माहितीबद्दल Madwanna यांचे आभार...

Last edited by शंकासूर (09-01-2013 <> 09:34:09 AM)

7

Re: वनस्पतीमधील श्वसन, प्राणवायू आणि पर्णछिद्रे

Dear Vedant and Madwaana, Thanks for additional information.

However, the original question remains unanswered. Whether, the STOMATA remains open during NIGHT?

and How do plants do exchange gases during night?