1

Topic: महास्फोट

महास्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.  महास्फोटाच्या आधीच्या क्षणी या विश्वाची अवस्था कोणती असेल (घन, द्रव वा वायू) व त्याचे तापमान किती असेल ?

2

Re: महास्फोट

महास्फोटाच्या क्षणी सर्व विश्व हे बिंदूवत अवस्थेत होते. सैद्धांतिकदृष्ट्या या वेळचा विश्वाचा आकार शून्य मानता येईल व तापमान अगणित मानता येईल. या महास्फोटाच्या अगोदर विश्वाची स्थिती कोणती होती हे सांगणं कठीण आहे. एका सिद्धांतानुसार विश्वाची सतत चक्रीय पद्धतिने निर्मिती आणि अंत होत असावा. या सिद्धांतानुसार आजच्या विश्वाच्या जन्मापूर्वीही आजच्या सारखे विश्व अस्तित्वात होते. ते स्वतःच्याच गुरूत्वाकर्षणापायी आकुंचन पावून शुन्यवत वा बिन्दूवत झाले व त्या बिन्दूवत अवस्थेतून आजच्या विश्वाची निर्मिती झाली असावी.

3

Re: महास्फोट

एका सिद्धांतानुसार विश्वाची सतत चक्रीय पद्धतिने निर्मिती आणि अंत होत असावा. या सिद्धांतानुसार आजच्या विश्वाच्या जन्मापूर्वीही आजच्या सारखे विश्व अस्तित्वात होते. ते स्वतःच्याच गुरूत्वाकर्षणापायी आकुंचन पावून शुन्यवत वा बिन्दूवत झाले व त्या बिन्दूवत अवस्थेतून आजच्या विश्वाची निर्मिती झाली असावी.
.......................................................................................................................................

हा सिद्धांत म्हणजेच विश्व स्थिरस्थिती सिद्धांत का?

विश्व स्थिरस्थिती सिद्धांता विषयी थोड तरी काही वाचनात येत नाही. आणि कोणी जरा सुद्धा लिहीत पण नाही. विश्व स्थिरस्थिती सिद्धांता विषयी देखिल जिज्ञासा आहेच. भले आज त्याला बाजूला सारले तरी तो नक्की काय होता?