1

Topic: Big sized Mars?

Someone told me that Mars is going to appear as big as Moon on August 27.

Is it true?  Then we can see details on Martian surface without any telescope....

It is really confusing.....!

2

Re: Big sized Mars?

मंगळ हा चंद्राएवढा दिसणं हे पूर्णपणे अशक्य आहे...!

इ.स. २००३ साली मंगळ पृथ्विच्या अगदी जवळ (तुलनात्मकदृष्ट्या) आला होता. ही तारीख २७ ऑगस्ट होती. तेव्हापासून दरवर्षी २७ ऑगस्टच्या सुमारास ही अफवा उठत आहे. या अफवांवर विश्वास ठेवणार्‌यांनी हे लक्षांत घ्यायला हवं की - खरोखरंच मंगळ चंद्राएवढा दिसणं शक्य होण्यासाठी मंगळ पृथ्वीच्या किती जवळ असायला हवा? ...आणि मंगळ पृथ्वीच्या इतका जवळ येणं शक्य आहे का?

सूर्याभोवती प्रदक्षिणा घालता घालता मंगळ आणि पृथ्वी हे काही वेळा एकमेकांच्या जवळून जातात. या काळात मंगळ हा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तेजस्वी व आकाराने मोठा दिसतो. असा पृथ्वीच्या जवळ आलेला मंगळ हा आपल्यापासून दहा कोटी किलोमीटरहून कमी अंतरावर आलेला असतो. काही वेळा हे अंतर साडेपांच कोटी किलोमीटर इतकं कमी असू शकतं.

मंगळाचा प्रत्यक्ष आकार हा चंद्राच्या आकाराच्या दुप्पट आहे. जर मंगळाला चंद्राजवळ आणून बसवला तर मंगळ हा चंद्राच्या दुप्पट आकाराचा दिसेल. जर मंगळ हा चंद्राएवढा दिसायला हवा असला, तर तो चंद्र आणि पृथ्वी या दरम्यानच्या अंतराच्या दुप्पट अंतरावर असायला हवा. आता चंद्राचं आपल्यापासूनचं सरासरी अंतर आहे पावणेचार लक्ष किलोमीटरहून थोडसं जास्त. म्हणजे मंगळ चंद्राइतका दिसण्यासाठी आपल्यापासून तो अवघ्या साडेसात लक्ष किलोमीटर अंतरावर असायला हवा. तुलना करा.....कुठे हे साडेसात लक्ष किलोमीटर आणि कुठे प्रत्यक्षातले साडेपाच कोटी किलोमीटर!

मंगळ खरोखरीच आपल्यापासून साडेसात लक्ष किलोमीटर अंतरावर आला तर, चंद्राच्या दहापट वजनदार असणार्‌या मंगळाने, आपल्या गुरूत्वाकर्षणाद्वारे पृथ्वीवरील समुद्राला चंद्रामुळे येते, त्याच्या दुपटीहूनही मोठी भरती आणली असती!

Last edited by rajeev (25-08-2010 <> 16:14:36 PM)

3

Re: Big sized Mars?

Thanks.

Now no more confusion about this....