1

Topic: जीवसृष्टी मुळे पृथ्वीग्रहाच्या वस्तुमानात वाढ होणे शक्य आहे का?

जीवसृष्टीच्या अस्तित्वामुळे पृथ्वी या ग्रहाच्या वस्तुमानात वाढ होणे शक्य आहे का?
काही अब्ज वर्षापूर्वी विश्वाचा आरंभ झाला. काही करोड वर्षापूर्वी सूर्यमालेतील इतर ग्रह आणि पृथ्वी निर्माण झाली. काही लक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टीला सुरवात झाली. कोणत्याही सजीवाच्या मृत्यूनंतर जो काही निर्जीव पदार्थ शिल्लक राहतो त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान वाढत असत का?

उदय नागांवकर

2

Re: जीवसृष्टी मुळे पृथ्वीग्रहाच्या वस्तुमानात वाढ होणे शक्य आहे का?

Very interesting question. The physics normally works on law of conservation of mass and energy. The living being on the earth are produced by elements on the earth, so once they die their elements go back to earth and its environment. So Life on earth will not cause increase in mass of the earth. Hope the answers helps. Thank you.

3

Re: जीवसृष्टी मुळे पृथ्वीग्रहाच्या वस्तुमानात वाढ होणे शक्य आहे का?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
हे उत्तर तस अपेक्षित होत पण,
जर एखादया जीवसृष्टी आणि त्याच जैविकचक्र असणाऱ्या ग्रहाचे वस्तुमान नेहमी एकसमान राहण्याकडे कल असेल किंवा नेहमी एकसमान रहात असेल तर.
त्या ग्रहाची भौतिक साधने जीवसृष्टीच्या संख्येवर किंवा जीवनचक्रावर नेहमीच मर्यादा ठेवत राहतील का?
परिस्थिती 1:
(समजण्यास सोप व्हाव म्हणून झाड आणि झाडासाठी भौतिक पदार्थ एवढ्याच 2 गोष्टीचा विचार करू)
समजा एका ग्रहावर फक्त एकाच प्रकारची झाडे आहेत;अगदी जवळपास समान उंचीची समान फांदी-पानांची. आणि त्याचं ठराविक काळाच जैविकचक्र आहे. बाकी काही जीवसृष्टी नाही.
तर त्या ग्रहाची भौतिकता त्या झाडांच्या ठराविक संख्येवर नियंत्रण ठेवेल का?
परिस्थिती 2:
आणि जर झाडांची संख्या वाढवायची असेल तर झाडाच्या उंचीत,फांद्या,पानात ऱ्हास होवून झाडांची संख्या वृद्धी होईल का?
ज्या ग्रहावर जीवसृष्टी निर्मितीसाठी पोषकता होती तोच ग्रह जीवसृष्टी वाढीवर मर्यादाहि ठेवतो का?