1

Topic: देहभान ( Consciousness )

देहभान

या ब्रह्मांडामध्ये समजण्यासाठी अतिशय कठीण कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मानवी मेंदू. मानवाने विज्ञानाच्या साह्याने बरीच प्रगती केली आहे तरीपण मेंदूच्या गूढ कार्याबद्दल अजूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. मेंदूतील अब्जावधी पेशी ज्यांना आपण Neuron म्हणतो , त्यांच्या एकत्रित कार्यामुळे आपण " मी" आहे असं म्हणतो. थोडक्यात काय तर पेशींच्या कार्यामुळे देहभान तयार होतं. शेवटी मेंदू मध्ये चालतं तरी काय.? इलेक्ट्रिक आणि रासायनिक सिग्नल्स ची देवाणघेवाण होत असते. जरी आपण उद्या प्रत्येक Neuron ची कार्यप्रणाली समजू शकलो तरी पण आपण चेतना / देहभान/ जाणीव ( Consciousness ) खरंच समजू शकतो का नाही ह्याची खात्री नाही.

Consciousness  म्हणजे काय ? ते खरंच अस्तित्वात आहे का ? का फक्त एक भौतिक क्रिया आहे आणि आपण ज्याला "मीपण" म्हणतो तो फक्त एक भ्रम आहे.? आपलं इथं असणं , विचार करणं , भावनिक होणं, सुख-दुःख ह्या सर्व गोष्टींचा थेट संबंध आपल्या मेंदूशी आहे. आणि मेंदू कशापासून बनलेला आहे तर मांसपेशींपासून. एखाद्या नुरोसर्जन ला कधी मेंदूची सर्जरी करताना पेशंटच्या विचारांबद्दल कळलं आहे असं कधी ऐकण्यात आलं नाही.
Cognitive Science एक स्वतंत्र शाखा आहे ज्यामध्ये फक्त आपल्या जाणिवेबद्दल रिसर्च केला जातो. Donald Hoffman एक Cognitive Scientist आहे. त्याने एक फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे, " आपण तेच पाहतो का जे खरंच अस्तित्वात आहे ?". का आपला मेंदू स्वतःच्या सोयीप्रमाणे वेगळंच जग निर्माण करतो.? उदा. बऱ्याच वर्षांपूर्वी मानवाला असं वाटायचं कि पृथ्वी सपाट आहे पण पायथॉगोरस ने सिद्ध केलं कि आपण चुकीचा विचार करत होतो. ज्या माणसाला रंगांधळेपणा  आहे आणि त्याला हे माहीतच नाही कि तो आजार त्याला आहे. मग काय होणार त्याचा मेंदू त्याला तो रंग दाखवणार जो तिथं नव्हताच. अशी कितीतरी उदाहरण देता येतील ज्यामुळे हे सिद्ध होत कि आपला मेंदू स्वतंत्र जग बनवतं जे आजूबाजूंच्या जगापेक्षा वेगळं असतं.
हे सर्व ऐकून तुम्ही म्हणाल मग आपल्या विचार करण्याला काय आधार आहे? खरं काय आणि खोटं काय ?

एकीकडे विज्ञान मेंदूच्या कार्याचा अभ्यास करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे इंजिनीर कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) बनवतं आहेत. Elon Musk, Stephan Hawking यासारख्या दिग्गज लोंकानी तर जगाला अगोदरच भीती घातलेली आहे. जर आपण सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता कॉम्पुटर मध्ये घडवू शकलो तर उद्या यंत्रे आपल्यावर राज करतील. Stephan Hawking तर म्हणतात कि हा शोध मानवाच्या इतिहासातील शेवटचा शोध असेन. आपल्या कितीतरी पिढ्या गेल्या पण मानवाच्या जगण्याचा खरा अर्थ कुणी सांगू शकला नाही आणि उद्या जर खरंच यंत्रमानव आला आणि आपल्याला गुलाम बनवून वापरू लागला तर काय होईल?


शेवटी जाता जाता एक प्रश्न स्वतःलाच विचारावा वाटतो, कि अजून किती दिवस लागतील स्वतःच्या अस्तित्वाची ओळख पटायला ?