1

Topic: अफाट विश्व आणि दुर्लभ मानवी जीवन

आपले विश्व साधारणपणे १३७० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असे मानले जाते. त्यानंतर साधारण ४६० कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. मग  यथावकाश सर्वं गोष्टी जुळुन आल्यावर पहिला एकपेशीय सजीव ३७० कोटी वर्षांपूर्वी भूतलावर प्रगटला. त्याच सजीवापासून उत्क्रांत  होत-होत, लक्षावधी प्रजातीमधून प्रवास करत, सुमारे १० लाख वर्षांपूर्वी वा-नरा पासून नर देह निर्माण झाला. या सर्व काळात पृथ्वीवर प्रचंड घडामोडी होत  होत्या.  या काळात  मोठमोठे प्रलय येउन गेले, प्रचंड मोठी हिमवादळे आली, कधी कधी तर हिमयुगे पण अवतरली. आकाशातील अति प्रचंड आकाराचे अशनी पृथ्वीवर आदळून ६.५ कोटी वर्षांपूर्वी डायनोसोर नष्ट झाले. पण काही सजीवांच्या प्रजाती तग धरून राहिल्या.
आपण शांतपणे बसून ह्या गोष्टीचा विचार केला की  आपल्या लक्षात येईल की आपण किती भाग्यवान आहोत की ह्या सर्व प्रोसेस मध्ये उच्च स्थानावर असलेल्या मानव जातीत आपल्याला direct जन्म मिळाला. आणि मग त्यासाठी आपण आपल्या आई - वडिलांचे आणि निसर्गाचे शतशः ऋणी असले पाहिजे. ह्या सर्वांचे ऋण फेडण्याचा जास्तीत -जास्त प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. पुढे जाऊन ह्या अनमोल देहाचे, तो जास्तीत जास्त दिवस टिकून राहील अशा पद्धतीने  आपण योग्य रीतीने संगोपन केले पाहीजे. ह्या दुर्लभ आणि भाग्यशाली मानव जन्मात कुतूहल आणि निरीक्षणाची दुर्बीण घेऊन सृष्टीतील चमत्कारांची अनुभूती घेतली पाहिजे.

2

Re: अफाट विश्व आणि दुर्लभ मानवी जीवन

मुलत: एक पेशीची किंवा एकपेशीय सजीवाची उत्पती हिच मोठी गोष्ट आहे.
त्यानंतर एकपेशीय सजीव ते आताचा मानव हा उत्क्रांतीचा प्रवास मानला तर
मुळात विचार प्रकियेला सुरवात पेशीपासूनच झाली अस जाणवतंय.
आणि नुसता पेशीचा विकास नाहीतर एक जीव साखळीहि तयार झालेली आहे.
ढोबळमानाने बघितल तर एक पेशी, मग वनस्पती, मग परागकणांचे परिवहन करणारे कीटक, मग शाकाहारी हरणे वगैरे प्राणी, मग मांसाहारी वाघ वगैरे प्राणी, सरते शेवटी सध्याचा मानव.
ह्या प्रवासात अनेक प्रश्नाची मालिका येते. आणि ते प्रश्न प्रयोगांच्या कसोटीवर तपासून बघण्याची जबाबदारी हि वाढते. मला नेहमीच वाटत कि अणू अभ्यासापेक्षा पेशी अभ्यास ज्यास्त गहन आहे.
उदय नागांवकर