1

Topic: सापेक्षतावाद आणि तापमान

एक साधी शंका आहे...

वायुचे तापमान हे वायुच्या रेणूंच्या गतिशी निगडीत असते. तापमान जितके जास्त तितकी या रेणूंची उर्जा आणि त्यामुळे अर्थातच या रेणूंची गती अधिक. विशिष्ट सापेक्षतावादानुसार गतितील वस्तूची लांबी, उर्जा, वस्तुमान हे गुणधर्म बदलतात. गतिचा असाच परिणाम तापमानावरही होतो का?

सापेक्षतावादाच्या भाषेत विचारायचे तर, वेगवेगळ्या संदर्भ चौकटीतून मोजल्यास एखाद्या वायुचे तापमान वेगवेगळे भासेल का?

2

Re: सापेक्षतावाद आणि तापमान

A good question...  But I am confused...


Is there anybody out there?

3

Re: सापेक्षतावाद आणि तापमान

हा एक चर्चेत असणारा प्रश्न आहे. गतितील वस्तू या अधिक उष्ण जाणावायला हव्यात असे काही संशोधकांचे मत आहे, तर काही शास्त्रज्ञ या निष्कर्षाशी सहमत नाहीत. ज्यांना गतितील वस्तुंचे तापमान अधिक असण्याची शक्यता वाटते, त्यांच्यातसुद्धा, तापमानातील बदलाचे प्रमाण किती असावे याबाबतही एकमत नाही.

4

Re: सापेक्षतावाद आणि तापमान

nice.. Q... trying to find out ext ans.......

5

Re: सापेक्षतावाद आणि तापमान

Thermodynamics मधे kinetic theory of gases हि सुद्धा हेच सांगते कि,  वायु जेवढा जास्त गतिमान असेल, तेवढे त्याचे तापमान वाढेल, 

पण याचे मुळ असे आहे कि वायूंचे अणू रेणू जेवढे जोरात पळतिल, तेवढे जोरात ते एकमेकांवर आपटतिल, त्यामुळे घर्षण होऊन तापमान वाढेल.

यामधे असेहि आहे कि जर वायू जोरात पळताना, एकमेकांवर किंवा बाजूच्या भिंतिंवर आदळले नाहित, तर, तापमान वाढ होणार नाहि. (हि फक्त theorotical आहे, खर्या आयुष्यात viscousity मुळे घर्षण होणारच त्यामुळे तापमान वाढनारच)

ज्याठिकाणी, जेवढा जास्त गतिला विरोध होईल, तेवढि जास्त तापमान वाढ दिसेल.