1

Topic: जिज्ञासा / कुतूहल

आपल्याला थंडी का वाजते किंवा थंडी वाजते म्हणजे शरीरात साधारण काय क्रिया घडतात

2

Re: जिज्ञासा / कुतूहल

मनुष्य हा उष्ण रक्ताचा प्राणी असल्याने त्याला शरीराचे तपमान नियंत्रित करावे लागते. वातावरणात उष्णता जास्त असल्यास, शरीरास घाम येतो ज्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातील उष्णता शोषून शरीरास थंडावा जाणवतो.

हिवाळ्यात थंडी असलेने शरीरास उष्णता देणे गरजेचे असते. अशावेळी शरीराच्या पेशी थरथरतात आणि उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे शरीरावरील केसही उभे राहतात. यालाच आपण थंडी वाजणे असे म्हणतो. शरीरातील विसर्जनामुळेही (मुत्र विसर्जन इत्यादी.)  शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणूनच थंडीत विसर्जनामुळे आरामदायक वाटते.