1

Topic: वनस्पति आणि रंग

वेगवेगळ्या रंगांचा वनस्पतींवर वेगवेगळा परिणाम होतो असे वाचले. हा परिणाम कसा होतो आणि का होतो?

2

Re: वनस्पति आणि रंग

वनस्पती मुख्यता मानवी डोळ्यांना दिसणारी प्रकाश किरणे वापरतात. आपणास ठाऊक आहे कि पांढरा रंग हा सात रंगांचे मिश्रण आहे. वनस्पतीमधील हरित लवके प्रामुख्याने लाल आणि निळा रंग प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात. इतर रंग शोषून घेण्याची त्यांची क्षमता कमी आहे. प्रकाश संश्लेषण करणारी संरचना करून ती विविध रंगामध्ये ठेवून आपल्याला प्रत्येक रंगामधील प्रकाश संश्लेषणाचा वेग सहज मोजता येईल.

तसेच आपल्याला दिसणारा रंग म्हणजे समोरच्या वस्तूवरून परावर्तीत झालेला रंग होय. वनस्पती आपल्याला हिरव्या रंगाच्या दिसतात अर्थात त्या हिरवा रंग परावर्तीत करतात त्यामुळे त्यांना हिरवा रंग वापरता येत नाही.

याशिवाय, वनस्पतीमध्ये फुले येण्याच्या प्रक्रियेचा आणि प्रकाशाच्या रंग व कालावधी यांचा  परस्पर संबंध आढळून येतो.