Topic: कचरा व्यवस्थापन
सत्यमेव जयतेचा कचरा व्यवस्थापनावर आधारित कार्यक्रम पाहिला. त्यात त्यांनी सांगितले कि-परदेशात जैविक कचर्यापेक्षा जास्त अजैविक कचरा असतो पण भारतात मात्र याच्या उलट जैविक कचरा जास्त आणि अजैविक कचरा कमी असतो. याचे कारण काय?
You are not logged in. Please login or register.
मराठी विज्ञान परिषदेने निर्माण केलेल्या या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत...! चर्चेत वा संवादात भाग घेण्यासाठी मराठी, English किंवा हिंदी यापैकी कोणतीही भाषा वापरता येईल. चर्चेचे अवलोकन कोणीही करू शकेल. त्यासाठी नोंदणीची आवश्यकता नाही. परंतु चर्चेत भाग घेण्यासाठी आपल्याला विज्ञानपीठावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आपल्याला आपला ई-मेल पत्ता द्यावा लागेल. (आपला ई-मेल पत्ता कोठेही जाहीर केला जाणार नाही.) विज्ञानपीठावर नोंदणी करताना काही अडचण आल्यास, व्यासपीठाच्या वापरासंबंधी काही मदत वा माहिती हवी असल्यास, तसेच व्यासपीठासंबंधी काही सूचना करायच्या असल्यास forum@mavipamumbai.org या पत्त्यावर ई-मेल करावे.
सत्यमेव जयतेचा कचरा व्यवस्थापनावर आधारित कार्यक्रम पाहिला. त्यात त्यांनी सांगितले कि-परदेशात जैविक कचर्यापेक्षा जास्त अजैविक कचरा असतो पण भारतात मात्र याच्या उलट जैविक कचरा जास्त आणि अजैविक कचरा कमी असतो. याचे कारण काय?
कदाचित भारतात अत्यंत दाटीवाटीने असणारी वस्ती आणि आपले आर्थिक मागासलेपण त्याला कारणीभूत असू शकेल.
या प्रश्नाचा संबंध आर्थिक स्थितीशी तर आहेच, परंतु इतर अनेक गोष्टीही याबाबतीत महत्त्वाच्या ठरतात.
जैविक कचऱ्यासंदर्भातः
यात परदेश म्हणजे कोणता देश? त्या देशातील खाण्याच्या सवयी कशा आहेत? हे महत्वाचे असते.
कारण प्रत्येक देशातील (अगदी एखाद्या देशातील वेगवेगळ्या प्रदेशांतही) खाण्याच्या सवयी वेगवगळ्या असू शकतात. त्यामुळे खाण्यातील पदार्थांनुसार कचऱ्याचे प्रमाण बदलू शकते. एखाद्या खाद्यपदार्थातून जास्त कचरा तयार होऊ शकतो तर दुसऱ्यातून कमी कचरा निर्माण होतो. एकाच खाद्यपदार्थाचा काही भाग एखाद्या देशात खाल्ला जात असू शकेल, तर दुसऱ्या एखाद्या देशात तो टाकावू समजला जात असतो.
एखाद्या देशात तयार पदार्थांचा वापर जास्त केला जात असेल तर एखाद्या देशात कमी. अशावेळी घरी कमी जैविक कचरा निर्माण होईल, परंतु हा खाद्यपदार्थ जिथे तयार केला जातो त्या कारख्यान्यात मात्र जैविक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असेल.
अजैविक कचऱ्याच्या संदर्भातः
एखाद्या वस्तुच्या बाबतीत तिचा वापर किती काळ केला जातो? अजैविक कचऱ्यातील उपयुक्त वस्तुंचा पुनर्वापर किती प्रमाणात होतो? या गोष्टी महत्वाच्या असतात.
सधन देशात एखादी वस्तू, ती वस्तू नव्या स्वरूपात बाजारात आली की अगोदरची जुनी वस्तू त्वरीत निकालात काढली जाते. भारतासारख्या देशात एखादी वस्तू पूर्ण खराब होईपर्यंत वापरली जाते. इतकेच नव्हे तर तर खराब झालेल्या वस्तूही भंगारवाला विकत घेतो व तिच्यातील उपयुक्त भागांचा पुनर्वापर करतो.
Powered by PunBB, supported by Informer Technologies, Inc.