1

Topic: Bindhast liha!!!

. प्रिय वैज्ञानिक मित्रहो,
विज्ञान म्हटल कि सर्व कस स्पष्ट आणि भरवश्याचे वाटते . आपल्या मनाला , बुद्धीला ते पटण्यासारख असत . ते नियमावर आधारित असत . आपल्या भावनिक जगाच्या खूप दूरवर आपल्याला घेऊन जात ते विज्ञान . विज्ञान हे काही मोठा प्रपंच नसतो किंवा जगण्यापेक्षा वेगळ काही नसत अख्ख ब्रम्हांड  (त्यामध्ये देव पण आलेच) सर्व काही विज्ञानाच्या नियमावर चालत. जर तुम्हालाही असच वाटत असेन तर तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी एक जग आहे !!! ते म्हणजे मराठी विज्ञान परिषद !!!
जग कुठल्या नजरेने विज्ञानाकडे पाहते ते सोडून द्या, कोण कुठे कसे कधी तर्क लावत आहे ते सोडून द्या, तुम्ही स्वतः कुठल्या नजरेने विज्ञानाकडे पाहता ते महत्वाचे आहें . फिश पॉट मधे ठेवलेल्या माशाला जग वेगळे दिसते तर समुद्रातील माशाला वेगळे तुम्ही स्वतः जगाला कुठून पाहता हे महत्वाचे आहे . तर मग न थांबता " माझंही मत " या शीर्षकाखाली बिनधास्त लिहा

2

Re: Bindhast liha!!!

विज्ञान प्रेमींनी जीवनातील कर्मकांड करताना वैज्ञानिक दृष्टीचा वापर करावा, आणि वैज्ञानिक बुद्धी वापरून कर्मकांडास  (अंधश्रद्धेस ) पाठबळ देण्याचे टाळावे.

3

Re: Bindhast liha!!!

मला भौतिकशास्त्र विषयात संशोधन करण्याची इच्छा आहे, मी बारावी २०१८ मध्ये ८२% गुण मिळवले आहेत
पुढे भौतिकशास्त्रज्ञ बनण्यासाठी मी कुठल शिक्षण घेऊ याबद्दल मला मदत करावे