1

Topic: लहर आणि माध्यम

कोणत्याही लहारीने प्रवास करताना माध्यम बदलले तर ती लहर अपवर्तीत (refract) होते. परंतु बदललेले माध्यम त्या लहारीसाठी घट्ट की पातळ हे कशावर ठरते? कारण जे माध्यम प्रकाशाला घट्टतर असते; ते माध्यम ध्वनीला तुलनेने पातळ असल्याचे दिसते.
म्हणजेच समजा आपल्यासाठी एखादा पदार्थ नवा असेल तर त्या पदार्थाचा विशिष्ठ लहारीसाठीचा पातळ-घट्टपणा कसा निश्चित करतात? केवळ प्रयोग करून की अन्य काही मार्ग आहे?

2

Re: लहर आणि माध्यम

Dear 'santoshsaraf',

I am confused...

Observing something, hearing something, touching something, smelling something.... When any of such things you do, you are actually doing an experiment. So there cannot be anything which does not involve experimentation.

3

Re: लहर आणि माध्यम

होय confusius! परंतु या कोणत्याही मार्गाने आपल्याला प्रयोग करणे शक्य नसेल तर? किंबहुना कोणताही पदार्थ एखाद्या विशिष्ठ लहारीसाठी किती पातळ अथवा घट्ट आहे हे कोण ठरवते ती लहर की तो पदार्थ? नेमके कोणाचे आणि कोणते गुणधर्म इथे महत्वाचे ठरतात?
म्हणजे उदाहरणार्थ, ज्या प्रकाशाची तरंगलांबी कमी, तो घट्ट माध्यमातून कमी वेगाने प्रवास करेल. पण हे बदललेले माध्यम त्या लहारीसाठी आधीच्या माध्यमाच्या तुलनेत घट्ट आहे की पातळ हे कसे ठरते?

4

Re: लहर आणि माध्यम

पदार्थाची घनता, विष्यंदिता (viscosity), काठिण्य असे प्रकाशशास्त्राशी संबंध नसलेले गुणधर्म हे त्या पदार्थाचे आंतरिक गुणधर्म आहेत. जर पदार्थाचे असे प्रकाशशास्त्राशी संबधित नसलेले गुणधर्म हे प्रकाशलहरीकडून ठरवले जात असते तर, प्रकाशलहरीच्या बदलत्या तरंगलांबीनुसार त्या त्या पदार्थाचे हे गुणधर्म बदलले असते.  उदाहरणार्थ, लाल रंगाच्या प्रकाशात जर एखाद्या वस्तूची घनता मोजली तर ती निळ्या रंगाच्या प्रकाशात मोजलेल्या घनतेपेक्षा वेगळी भरली असती. प्रत्यक्षात असे कुठेही आढळत नाही.

त्यामुळे आपल्या प्रवासाचे माध्यम हे अधिक घन आहे की कमी घन आहे ते प्रकाशकिरणाकडून ठरवले जात नाही. किंबहूना प्रकाश किरणांनी कोणत्या वेगाने प्रवास करायचा हे ते माध्यम ठरवते.

5

Re: लहर आणि माध्यम

Yes...  It is convincing arguement from 'anonymous'!

6

Re: लहर आणि माध्यम

प्रकाश किरणांनी कोणत्या वेगाने प्रवास करायचा हे ते माध्यम ठरवते.>>>> पण मग वेगवेगळ्या लहरींना वेगवेगळा नियम का? पाण्यात ध्वनी लहरींचा वेग हवेपेक्षा अधिक असतो तर प्रकाशाचा वेग मात्र कमी होतो म्हणजे माध्यमाची घट्टता अथवा विरलता लहारीन्साठी समान नाही हेच यातून समजते.

7

Re: लहर आणि माध्यम

'santoshsaraf' is comparing sound waves with light waves. No doubt both are waves, but are of different nature. Can such comparison be considered valid in this case?

Is it not like treating 'custard apple' and 'pineapple' on the same footing, only because both are fruits and names of both the fruits contain word 'apple'?

I am confused...

Last edited by Confucius (02-11-2013 <> 10:53:26 AM)

8

Re: लहर आणि माध्यम

Confucius, मी वेगवेगळ्या लहरींची केवळ लहरी असल्याने तुलना करतो आहे असे नव्हे. मूळ प्रश्नात देखील मी ते स्पष्ट केलेले आहे. कोणत्या लहारीसाठी कोणते माध्यम पातळ आणि कोणते माध्यम घट्ट हे कसे ठरवायचे असा माझा प्रश्न आहे. कारण कस्टर्ड एपल आणि पायनापल या दोघांनाही गती दिलेली असताना त्यांना होणार्या विरोधासाठी माध्यमांतला तर-तम भाव बदलत नाही.

9

Re: लहर आणि माध्यम

Now I have understood what 'santoshsaraf' says. What he has said about the relation between waves and matter, can be viewed in other way...

Consider a vehicle which is moving with a certain speed on a flat (horizontal) road. Suppose, this vehicle comes across a hilly terrain. Now, the vehicle starts climbing up the hill. Consequently, speed of the vehicle reduces due to the slope of the road. But according to 'santoshsaraf', it is other way. It is the decrease in the speed of the vehicle that has caused the road to become inclined.

In that case, you can increase or decrease the slope of road by merely changing the speed of vehicle. With this concept, basis of civil engineering used in the construction of roads will have to be changed altogether.

Situation appears to be interesting... But it has left me confused...

Last edited by Confucius (07-11-2013 <> 22:46:36 PM)

10

Re: लहर आणि माध्यम

मी अधिक माहिती गोळा केली. मला आता या प्रश्नाचे समजलेले उत्तर असे- लहरो दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे पाण्यावरच्या लाटेसारखी- अवतरंग (transverse) आणि दुसरी ध्वनीप्रमाणे सरळ आघात करत जाणारी- अनुतरंग (longitudinal) . या दोन प्रकारच्या लहरींमध्ये असलेल्या प्रसारणाच्या पद्धतींमुळे त्या ज्या माध्यमांतून प्रवास करतात त्या माध्यमांची घनता यांच्यासाठी वेगवेगळी असते.
म्हणजे प्रकाशाची लहर अवतरंग. त्यामुळे प्रकाशाला पाण्यापेक्षा हवा पातळ. तर ध्वनीची लहर अनुतरंग. त्यामुळे तिला हवेपेक्षा पाणी पातळ.  (पातळ म्हणजे प्रवासास सुलभ असा अर्थ घ्यावा.)

11

Re: लहर आणि माध्यम

Dear 'santoshsaraf',

That is why I raised a doubt about the validity of comparison of these two totally different types of waves in my post dated 01-11-2013.

Anyway, now there is no confusion...